facebook
Thursday , December 8 2016
Home / नागपूर / ​ २५९ गावांची वाय-फाय वाटचाल
wifi

​ २५९ गावांची वाय-फाय वाटचाल

ग्रामपंचायतींना ऑनलाइन जोडण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सोबतच व्ही-सॅटच्या माध्यमातून जिल्ह्यातील २५९ गावे वाय-फाय होणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ कसा होईल, या दृ‌ष्टिकोनातूनही विचार सुरू असल्याचे कळते.

माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून व्हीसॅटद्वारे वाय-फाय गावे करण्यात येत आहे. याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडकेही देण्यात आली आहे. यासाठी सर्व निधी माहिती व तंत्रज्ञान विभागच देणार असून देखरेख जिल्हा परिषद करेले. पहिल्या टप्‍प्यात सात तालुक्यातील २५९ गावांचा वाय-फायमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात भिवापूर, नागपूर ग्रामीण, रामटेक, सावनेर, काटोल, उमेरड तालुक्यातील गावांचा समावेश आहे. यासंदर्भात अलीकडेच माहिती व तंत्रज्ञान प्रधान सचिवांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायती २ ऑक्टोंबरपर्यंत डिजिटल करण्याचा मानस आहे. सध्या ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती डिजिटल झालेल्या आहेत. आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत पाचगाव, तर हिंगणा तालुक्यातील दाभा ये‌थेही ‘वाय-फाय’ सुविधा देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. तर, काही ठिकाणी केवळ खड्डे करून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने काही ग्रामपंचायतींनी खोदकामाला विरोध केल्याचे कळते. राखीव जंगलातून रस्‍त्यांच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन कामे तातडीने करण्याच्या सूचना सीइओंनी दिल्या आहेत.

Check Also

wari

नागपुरात रंगणार ‘शिक्षणाची वारी’

विदर्भातील शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे प्रदर्शन नागपुरात गुरुवारपासून सुरू होणार आहे. शिक्षणाची वारी म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *