facebook
Thursday , December 8 2016
Home / नागपूर / उसनवारीवर चालते सुपरची पॅथॉलॉजी
pathology

उसनवारीवर चालते सुपरची पॅथॉलॉजी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आठ कोटी रुपये खर्चून सेंट्रल स्टेरिलायझेशन स्टोअर तयार करण्यात येत आहे. मात्र, हे स्टोअर पॅथॉलॉजी विभागाच्या जागेत बांधले जात आहे. त्यामुळे सुपरच्या पॅथॉलॉजीत उसनवारीवरील जागेत रुग्णांचे सॅम्पल तपासले जात आहेत. बायोकेमेस्ट्री विभागात आणि इतर दोन खोल्यांमध्ये या विभागाचे काम सुरू आहे.

सुपरमध्ये तयार होणाऱ्या स्टेरिलायझेशन स्टोअरमध्ये एकाच वेळी रुग्णांचे कपडे, शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारी साधने, तसेच इतरही साहित्य निर्जंतूकीकरण शक्य होणार आहे. या विभागाचे काम सुरू झाले असून येत्या सहा महिन्यांत ते पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मात्र, हा विभाग पॅथॉलॉजी विभागात तयार करण्यात येत असल्याने पॅथॉलॉजी विभाग मागे पडत आहे. या विभागाच्या जागेचा विचार न करता स्टेरिलायझेशन स्टोअरच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाचे रक्ताचे, मल-मूत्राचे तसेच इतरही चाचण्या पॅथॉलॉजी विभागामार्फत होतात. या ठिकाणी रुग्णाच्या पुढील चाचणीसाठी रक्ताचे नमुने देखील ठेवण्यात येतात. मात्र, विभागाची हक्काची जागा काढून घेतल्याने हा विभाग अनाथ झाला आहे. बायोकेमिस्ट्री विभागात हा विभाग सुरू आहे. बायोकेमिस्ट्री विभागाची जागा पॅथॉलॉजी विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या निर्णयाला धाब्यावर बसवत बायोकेमिस्ट्री विभागाने अजूनही जागा दिलेली नाही. उपचाराची दिशा ठरविण्यासाठी या चाचण्या महत्त्वाच्या असतात. हा अहवाल पॅथॉलॉजी विभाग देतो. मात्र, जागाच नसल्याने चाचण्यांचे अहवाल घेण्यात रुग्णांना देखील अडचण होत आहेत. सुपरच्या स्वच्छतेचा प्रश्न मिटला मात्र, रुग्णांना अधिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

Check Also

wari

नागपुरात रंगणार ‘शिक्षणाची वारी’

विदर्भातील शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे प्रदर्शन नागपुरात गुरुवारपासून सुरू होणार आहे. शिक्षणाची वारी म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *