facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / पाक कलाकार मायदेशी!

पाक कलाकार मायदेशी!

सध्या मुंबईत एकही पाकिस्तानी कलाकार नसून, सर्वांनी मुंबईसह महाराष्ट्र सोडला आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिनेशाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी रविवारी केला. इतकेच नव्हे, तर चित्रपट व टीव्हीसृष्टीत कार्यरत असलेल्या अनेक निर्मात्यांनी आपण यापुढे पाकिस्तानी कलाकारांना आपल्या कलाकृतीत घेणार नसल्याचे पत्र आपल्याला दिल्याची माहितीही त्यांनी दिली. पाकच्या दहशतवादी कारवाया पाहता भारतात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासांत मुंबई सोडावी, असे फर्मान मनसेने सोडले होते. त्याबाबत खोपकर यांनी ‘मटा’ला माहिती दिली.
याबाबत खोपकर म्हणाले, ‘आम्ही ४८ तासांची मुदत दिली होती. या काळात अनेक पाकिस्तानी कलाकारांनी मुंबईसह भारत सोडला आहे. काही मंडळी थेट पाकिस्तानात गेली. तर काहींनी दुबईमार्गे जाणे पसंत केल्याचे आमच्या सूत्रांकडून कळले आहे. याशिवाय, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाइट्स बचाव’ आदी निर्मात्यांनीही आपण पाकिस्तानी कलाकार घेणार नाही असे लिहून दिले आहे. सिनेसृष्टीतील अनेक बड्या निर्मात्यांनीही आपल्या आगामी सिनेमात पाकिस्तानी कलाकार नसेल, असे सांगितले आहे. भारत आणि पाक दरम्यानचे संबंध सुधारल्यानंतर त्यांनी भारतात यावे.’ ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’च्या पहिल्या सीझनमध्ये शकील सिद्दीकी हा पाक कलाकार सहभागी होता. तर ‘बिग बॉस’मध्ये यापूर्वी पाक अभिनेत्री वीणा मलिकने हजेरी लावली होती.

वांद्रे एमआयजी क्लब येथे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी झाली. या बैठकीत सध्या राज्यभर सुरू असलेल्या मराठा मोर्चांच्या निमित्ताने राज यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा झाल्यानंतर राज ठाकरे याबाबत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. कोपर्डी येथील बलात्कारानंतर अॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबत राज ठाकरे यांनी सर्वप्रथम आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरे यांनी स्पष्ट व थेट भूमिका घेतल्यानंतरच या प्रश्नाबाबत सर्व पक्षीय नेत्यांना जाग आली आणि प्रत्येकजण त्याबाबत बोलू लागला, असेही नांदगावकर यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखेला भेट देणार असून गट अध्यक्षांशी सविस्तर चर्चा करणार आहेत.पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम बंद केल्याबद्दल झी वाहिनी आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे मनसेने आभार मानले आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *