facebook
Sunday , December 4 2016
Home / जळगाव / मराठा समाजासोबत मुस्लिमांना हवे आरक्षण
reservation

मराठा समाजासोबत मुस्लिमांना हवे आरक्षण

मराठा व मुस्लिम हे दोन्ही समाज ८५ ते ९० टक्के आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत. ग्रामीण भागात राहणारा मुस्लिम समाज परंपरागत व्यवसायातच गुंतला आहे. त्यामुळे त्याचा विकास खुंटला आहे. मराठा समाजासोबतच मुस्लिम समाजालादेखील पाच टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी केली.

महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेव्दारे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. रागीब अहमद, प्रा. फिरोज शेख आदी उपस्थित होते. आरक्षण धर्माच्या आधारावर मिळावे हे मान्य नसून, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक आधारावर मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक हे खेड्यात राहतात. मुस्लिमांच्या संदर्भात डॉ. महमूदूर रहमान कमिटीने विस्तृत मांडणी केली. संघटनेकडून प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणाबाबत बैठका घेण्यात येत आहेत. याबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यभरातून सुमारे २५ ते ३० हजार मुस्लिमांचा मोर्चा काढण्यात येऊन मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Check Also

aawaz-news-image

पुरुषोत्तम करंडकाच्या तयारीला वेग

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – येत्या ३ ते ४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *