facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / मोबाइल चोराला एका दिवसाची पोलिस कोठडी

मोबाइल चोराला एका दिवसाची पोलिस कोठडी

तरुणीच्या सनकोटमधून मोबाइल व एटीएम कार्ड चोरणारा आरोपी इम्रान खान दुल्हे खान पठाण (३२, सरदार नगर, धुळे) याला प्रथम वर्ग न्याय दंडाधीकारी पी. व्ही. हिंगणे यांनी एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी उस्मानपुऱ्यातील एकनाथ नगरात राहणाऱ्या अलिशिबा राजेंद्र श्रीसुंदर (वय २०) यांनी तक्रार दिली होती. अलिशिबा या १७ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास कोकणवाडी येथील अहल्याबाई होळकर चौकात काही सामान आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी इम्रान खान याने त्यांच्या सनकोटमधून मोबाइल व एटीएम कार्ड हिसकावून धूम ठोकली होती. याप्रकरणी तरुणीने त्याच दिवशी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी इम्रान खानला २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक करून २५ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर केले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *