facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / सांगलीत मराठा एल्गार – मूक मोर्चाने संपूर्ण रस्ते भगवेमय

सांगलीत मराठा एल्गार – मूक मोर्चाने संपूर्ण रस्ते भगवेमय

आवाज न्यूज लाईन

मूक मोर्चाने संपूर्ण रस्ते भगवेमय
संथ वाहणाऱ्या कृष्णामाईला महापूर आल्यानंतर पाणी पात्राबाहेर पडते, अगदी तसेच चित्र मंगळवारी सांगलीतल्या सर्वच रस्त्यांवर दिसून आले. मिरजेचे मिशन हॉस्पिटल ते सांगलीचा राम मंदिर असा सुमारे अकरा किलोमीटरचा पट्टा भगवामय झाला होता. मराठा समाजाच्या भव्य मोर्चात भगवे ध्वज उंचावत गर्दी रस्त्यांवर येताच रस्ते दिसेनासे झाले. नजर जाईल तिकडे भगवा रंगच वाहताना दिसू लागला. मराठा समाजाच्या मूक क्रांती मोर्चाने शिस्तीचा मानदंड कायम ठेवत ‘अंदाज पावसापाण्याचा लावायचा असतो, मराठ्यांचा नाही,’ ‘अत्याचार करु देणार नाही आणि सहनही करुन घेणार नाही,’ ‘आता समाजाला न्याय मिळेपर्यंत आता माघार घेणार नाही,’ असा इशारा देत मंगळवारी लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांनी गर्दीचा उच्चांक केला.

पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने घे54546707-cmsतलेली काळजी आणि मोर्चेकऱ्यांनी घडवलेले शिस्तीचे जबरदस्त दर्शन यांचा तंतोतंत मेळ बसला आणि गेले अनेक दिवस गाजत असलेला मराठा समाजाचा मूक मोर्चा मंगळवारी शांततेत पार पडला. मोर्चा मूक असला तरी प्रत्येकांच्या ओठाआड लपलेला हुंकार स्पष्टपणे जाणवत होता. कोण नेता आलाय, तो कुठून कसा जाणार आहे, याची अजिबात चौकशी न करता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून, परजिल्ह्यातून, राज्यातून आलेला मराठा बांधव मोर्चाच्या मार्गाकडे येत होता. पहाटेपासूनच चौकाचौकांत भगवे ध्वज फडकत होते. सहा वाजल्यापासून रस्त्यावरची वर्दळ वाढू लागली. नऊच्या सुमारास गर्दी फुलू लागली. साडेदहा वाजण्याच्या सुमारास गर्दीत रस्ते अस्तित्व हरवून बसले आणि सव्वा अकरा वाजता विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. बाल शिवाजी, जिजामाता, तलवार उंचावत झाशीच्या रुपातील मुलेमुली अग्रभागी, त्यानंतर पाच फुटांवर पेटती मशाल घेतलेल्या पाच मुली, त्यांच्या मागे भलामोठा ध्वज उंचावणारी मुलगी, मराठा क्रांती मूक मोर्चाचा एकच फलक घेऊन महिलांचा जथ्था, अशी रचना होताच मोर्चाला सुरुवात झाली.

विश्रामबागहून मोर्चाला सुरुवात झाली त्याचवेळी मध्यवर्ती बसस्थानकासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला क्रांती मोर्चातील रणरागिणींनी अभिवादन केले. त्यानंतर भगव्या गर्दीत हरविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मुलींनी आभिवादन केल्यानंतर त्या दहा मुलींच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या जनसमुदायाचा झंझावत राजवाडा चौकात आले. त्यानंतर दहा मुलींनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना दिले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *