facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / करण जोहरविरोधात मनसेची निदर्शनं

करण जोहरविरोधात मनसेची निदर्शनं

आवाज न्यूज लाईन

उरी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांविरोधात धडक मोर्चा उघडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज बॉलिवूड सिनेनिर्माता करण जोहरच्या ऑफिसबाहेर निदर्शनं केली. पाकिस्तानी कलाकाराचं समर्थन करणाऱ्या, त्यांना आपल्या सिनेमात काम देणाऱ्या करण जोहरविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित होऊ देणार नाही, असंही पुन्हा ठणकावलं.

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अख्खा देश पाकिस्तानवर खवळलाय. जनतेच्या या तीव्र भावना ओळखूनच, मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिला होता. ४८ तासांत देश सोडा, अन्यथा आमच्या स्टाइलनं पळवून लावू, अशी धमकी मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं दिली होती. त्यानंतर मुंबईतील सर्व पाकिस्तानी कलाकार निघून गेल्याचा दावा मनसेनं केला आहे. फवाद खाननंही गुपचूप देश सोडल्याचं वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर, आज मनसे कार्यकर्त्यांनी अंधेरीतील धर्मा प्रॉडक्शनच्या कार्यालयावर धडक दिली. फवाद खानची प्रमुख भूमिका असलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी तंबी मनसेनं आधीच दिली होती. तेव्हा, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणं हा दहशतवादी हल्ल्यांवरचा उपाय नसल्याचं मत करण जोहरनं मांडलं होतं. त्यावरूनच मनसे कार्यकर्त्यांनी आज त्याचा निषेध केला. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *