facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / खडसेंच्या बोलण्याने सतरंजीही हलणार नाही – अजित पवार

खडसेंच्या बोलण्याने सतरंजीही हलणार नाही – अजित पवार

आवाज न्यूज लाईन

‘मी जर बोललो तर अख्खा देश हादरेल, असे म्हणणारे एकनाथ खडसे काहीच बोलत नाहीत आणि काही बोलले तर पायाखालची सतरंजी देखील हलणार नाही,’ असा टोला लगावत अजित पवार यांनी भाजप-शिवसेना युतीच्या कारभारावार अनेक दाखले देत टीका केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वतंत्र लढवून एकहाती सत्ता प्राप्त करण्याबाबबत त्यांनी कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’ असे आदेश दिले.

आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या ‘लक्ष्य २०१७’ या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते. त्यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
देशात ‘सोशल मीडिया’चा वापर करून जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेले नरेंद्र आणि देवेंद्र यांचे सरकार लबाड असून ‘अच्छे दिन’ कोठे आहेत, अशी विचारणा मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे. आता तरी लोकांनी स्वप्नपूर्तीसाठी बांधील असलेल्या राष्ट्रवादीबरोबर राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशात राज्यात सत्ता नसतानाही पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर या महानगर पालिकांप्रमाणेच पुणे जिल्हा परिषद आणि अनेक ठिकाणी राष्ट्रवादी मोठी विकास कामे करीत आहे. गेली दोन वर्षे ग्रामीण मतदारांचा भ्रमनिरास झाला असून, याचा फायदा कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत घ्यावा असे आवाहन केले.

सुप्रिया सुळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण, माणिक झेंडे, सुदामराव इंगळे, माजी आमदार अशोक टेकवडे, दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, शहर अध्यक्ष संतोष जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जालिंदर कामठे आदींसह कार्यकर्त्यांनी निवडणुकीबाबत स्पष्ट मते व्यक्त केली. सभापती अंजनाताई भोर, ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, अमृता घोणे, मानसीताई जगताप, अशोकराव ओव्हाळ, नारायण निगडे आअणि बबन भाऊ टकले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *