facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / खासगी दौरा आता ‘खिशातून’

खासगी दौरा आता ‘खिशातून’

आवाज न्यूज लाईन

महापालिकेच्या मालकीच्या वाहनांचा योग्य वापर व्हावा, इंधन खर्चात बचत व्हावी याकरिता प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. वाहन वापरासंदर्भात नवी नियमावली बनविण्यात आली असून वाहनांचा खासगी कामासाठी वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास अधिकाऱ्यांच्या वेतनातून खर्चाची कपात होणार आहे. आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना लेखी सूचना केल्या आहेत. पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात आलेल्या मोटारींना हा नियम लागू असून संबंधितांच्या मानधनातून खर्च कपात होणार आहे.

महापालिकेच्या मालकीची १४० वाहने आहेत. पाणी पुरवठा विभाग, टँकर, अतिक्रमण, आरोग्य विभागाकडे वाहने आहेत. जेसीबीसह कचरा वाहून नेण्यासाठी आर सीट्रक, डंपर या वाहनांचा समावेश आहे. महापालिकेचे पदाधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे मिळून २९ वाहने आहेत. महापालिकेचा दरमहा इंधनावर २४ लाख रुपये खर्च होतो.

दुसरीकडे महापालिकेच्या मालकीच्या वाहनांचा गैरवापर होत असल्याचे सामोर आले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या नावाखाली खासगी कामासाठी काही जण वापर करत आहेत. महापालिका कार्यक्षेत्राच्या बाहेर वाहनांचा प्रवास सुरू आहे. यामुळे इंधन खर्चात वाढ होत आहे. महापालिकेला आर्थिक फटका बसत आहे. इंधन खर्चात बचत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. महापालिका कार्यक्षेत्राबाहेर वाहने नेण्यात येऊ नयेत. कार्यालयीन कामकाजसाठी मुंबई दौरा करतानाही महापालिकेच्या वाहनांचा वापर करू नये. राज्य महामंडळाच्या बसेस अथवा रेल्वेने प्रवास करावा अशा सक्त सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *