facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘डेंग्यू’मुळे महासभेत खडाजंगी

‘डेंग्यू’मुळे महासभेत खडाजंगी

आवाज न्यूज लाईन

आठ धुरळणी यंत्रांची होणार तत्काळ खरेदी, अतिरिक्त कर्मचारी नेमणार; आयुक्तांचे आदेश
जळगाव शहरात डेंग्यूची साथ पसरली असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या साथीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची लक्षवेधी डॉ. अश्विन सोनवणे यांनी महापालिकेच्या महासभेत मांडली. या मुद्द्यावरून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर तत्काळ आठ नवीन धुरळणीयंत्रांची खरेदी करून मलेरिया विभागाला उपाययोजना करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
महापौर नितीन लढ्ढा अनुपस्थित असल्याने महासभा उपमहापौर ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंचावर आयुक्त जीवन सोनवणे, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे डॉ. अश्विन सोनवणे यांनी जळगावातील डेंग्यूच्या साथीवर लक्षवेधी मांडली. पृथ्वीराज सोनवणे यांनी धुरळणी यंत्र नसल्याचे सांगत प्रत्येक वॉर्डात कर्मचारी देण्याची मागणी केली. आयुक्तांनी तत्काळ आठ धुरळणी यंत्र खरेदी करण्याच्या सूचना दिली. सध्या असलेल्या ७८ कर्मचाऱ्यांसह आणखी कर्मचारी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात आरोग्याचा प्रश्न असताना सफाईची तक्रार केली म्हणून मक्तेदार धमक्या देतात. आरोग्य निरीक्षक तक्रार करतात म्हणून नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी संताप व्यक्त करत अश्या मक्तेदार व निरीक्षकांना चौकात शिक्षा केली पाहिजे या शब्दांत त्यांनी संतात व्यक्त केला. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्यांचे मागील पंचवार्षिकमधील एक वर्ष व यंदाचे तीन वर्षांचे मानधन उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवनांच्या कुटुंबियांना देत असल्याची घोषणा महासभेत केली. रवींद्र पाटील यांनी आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक या रस्त्यावरील बंद करण्यात आलेला दुभाजक खुला करावा, अशी मागणी केली. मात्र, अनंत जोशी यांनी दुभाजकाची जागा अपघातग्रस्त असल्याने तो बंदच राहू द्यावा, असे सांगितले.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *