facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / पंढरीत गुटखा आणि पान मसाल्यावर मोठी कारवाई, माखोचा माल जप्त अनेक वर कारवाई.

पंढरीत गुटखा आणि पान मसाल्यावर मोठी कारवाई, माखोचा माल जप्त अनेक वर कारवाई.

आवाज न्यूज लाईन

पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – पंढरपूर शहरामध्ये आज दुपारी अनेक गुटखा आणि पान मसाला व्यापार्यावर धाडसत्र सुरु असून पुण्याच्या अन्न व भेसळ पथकाच्या अधिकाऱ्यांनी सर्वात मोठी कारवाई करून सुमारे चाळीस लाखाचा गुटखा आणि पान मसाला पकडला आहे.

तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर मध्ये लाखो भाविक येत असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. अशा गर्दी मुळे पंढरपूरची मोठी आर्थिक उलाढाल ही होत असून येथे केवळ पंढरीच्या प्रसादाची विक्री होत नसून अनेक अवैध धंदे ही चालतात. अशा अनेक धंद्यावर पोलीस कारवाई करते तरीही असे अवैध धंदे करणारे लोक हे आपला धंदा सुरूच ठेवतात. याचे मुख्य कारण म्हणजे याच पोलिसांचे लागेबांधे असतात.

महाराष्ट्र शासनाने युवा पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी मागील काही वर्षा पूर्वी गुटखा आणि तंबाखू मिश्रित पानमसाला यावर बंदी घातली आहे. मात्र लोकांना लागलेली सवय बदलणे कठीण असते. शासनाने कितीही मोठे निर्बंध घातले तरी कंपन्या त्यावर पर्याय शोधून आपला धंदा करते. याचे जिवंत उद्हारण म्हणजेच गुटखा आहे. अशा गुटख्याची मोठी उलाढाल पंढरपुरातून होते कारण कर्नाटकातील गुटखा हा पंढरीत येऊन मग सांगोला, माळशिरस, नातेपुते, करमाळा, बार्शी, माढा, कुर्डूवाडी आणि थेट लातूर पर्यंत हा गुटख्याचा माल जातो त्यामुळे इथे नियमित लाखोची उलाढाल होत असते.

आज पंढरपूर मध्ये पुण्यातील अन्न व भेसळ विभागाच्या पथकाने शहरातील खबर्या मार्फत माहिती घेऊन अनेक गुटखा विकणाऱ्या व्यापार्यावर कारवाई केली मात्र त्यांच्या हाती मोठ्या कारवाई साठी मोठे मासे गळाला लागले नव्हते. अशा किरकोळ कारवाईतील व्यापार्यांना नगर पालिकेच्या अन्न व भेसळ प्रशासन कार्यालयात आणले असता यातीलच एकाने या पथकाला माहिती दिली असता अशा माहितीच्या आधारे गोकुळ नगर येथे असणाऱ्या रज्जाक तांबोळी यांच्या घरामध्ये या पथकाने छापा टाकला असता डोके चक्रावून टाकणारा एवढा माल सापडला, यामध्ये लाखो रूपयाचा गुटखा आणि लाखो रुपयाचे तंबाखू मिश्रित पान मसाल्याचा माल आणि मोठ्या प्रमाणात माव्याला मागणारी सुपारीचा माल सापडला ही कारवाई इतकी मोठी होती की बंदोबास्तासाठी पोलीस बोलवावे लागले, कारण या रज्जाक तांबोळी यांच्या बंगल्यातील प्रत्येक रूम मध्ये एवढा मोठा माल होता की हा माल या व्यापाऱ्यांचे घरातील लोक आणि कर्मचारी गाडीत घालून पळवण्याचा प्रयत्न करत होते.

वास्तविक हा एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारा हा माल पहिल्यांदा आला नसून या पूर्वीही या व्यापार्यावर कारवाई झाली, परंतु त्या कारवाया ठरवून झाल्याच्या दिसून येतात. कारण पंढरपूर मध्ये अन्न व भेसळ अधिकारी असून त्यांचे स्वतंत्र कार्यालय सुद्धा आहे. मात्र या संबंधित अधिकार्याला पंढरपूर मध्ये गुटखा कोठून येतो, कोणा कडे याची मोठी विक्री होते हे माहित असताना देखील आज पर्यंत अशा विक्रेत्यावर कारवाई झाली नाही. वास्तविक पंढरपुराचे अन्न व भेसळ अधिकारी हे स्थानिक पंढरपूरचेच असून त्यांची मोठी राजकीय ताकद असल्याने त्यांची आज पर्यंत बदली होऊ शकली नाही.

पंढरपुरातील सामारे दहा ते बारा व्यापार्यावर कारवाई करण्यात आली असून रज्जाक तांबोळी यांच्या घरामध्ये सर्वात जास्त म्हणजे सुमारे चाळीस लाखाचा माल सापडला असून तो मोजण्यासाठी या पथकाला पूर्ण दिवस लागला. त्यानंतर कालिका चौकातील सत्तार तांबोळी यांच्या घरामध्ये छापा टाकण्यात आला असता त्यांच्याही घरामध्ये गुटखा आणि तंबाखू मिश्रित पान मसाला आढळून आला. मात्र रज्जाक तांबोळीच्या घरातील कारवाईला उशीर लागत असल्याने हे घर आणि गोडाऊन पोलिसांनी ताब्यात घेऊन बंद ठेवले. ही कारवाई पुढे रात्रभर सुरु राहणार असून ही कारवाई पुण्याचे ज्वाईट कमिशनर एस. एस. देसाई, सालोपुरचे अ.कमिशनर संजय नारागुडे आणि पंढरपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *