facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / येत्या १ ऑक्टोबरपासून पनवेल महापालिका

येत्या १ ऑक्टोबरपासून पनवेल महापालिका

आवाज न्यूज लाईन

पनवेल: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेवर आज अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्य सरकारनं आज याबाबतची अधिसूचना काढली असून त्यानुसार येत्या १ ऑक्टोबरपासून पनवेल नगरपरिषदेचं रुपांतर महानगरपालिकेत होणार आहे. महापालिकेत जाण्यास विरोध असलेल्या खारघरसह एकूण ३२ महसुली गावांचा या महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिली महापालिका ठरणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही नवी पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे. सिडकोच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणाऱ्या नयना क्षेत्रातील ३६ गावं महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. नवी मुंबई-पनवेल-उरण परिसराचं नागरीकरण सातत्यानं वाढत असून त्याचा पायाभूत सोयीसुविधांवर मोठा ताण पडत आहे. या भागाच्या विकासाचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल महापालिकेतील गावं
तळोजे, पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, कामोठे, चाळ, नावडे, तोंढरे, पेंधर, कळंबोली, रोडपाली, खिडूक पाडा, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंभोडे, आसूडगाव, बीड, आडीवली, रोहिंजण, धानसर, पीसार्वे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजे मजकूर, घोट, कोयनावेळे

नयनातील वगळलेली गावे
अदई, आकुर्ली, पालीदेवद, देवद, वीचुंबे, उसर्ली खुर्द, शिल्लोतर, रायचूर, चिपळे, बोनशेत, विहीखर, चिखले, कोन, डेरीवली, पळस्पे, कोळखे, शिवकर, कोर्पोली, केवाले, नेर, हरीग्राम, नितलास, खैराणे खुर्द, कानपोली, वलप, हेदुटने, पालेबुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोली, अंबीवली, मोहो, नांदगाव, कुडावे, वडीवली, तुरमाले, चिरवत

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *