facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / काँग्रेस-राष्ट्रवादीत व्यंगचित्र वाद – सेनेचा इशारा
vikhe-desai

काँग्रेस-राष्ट्रवादीत व्यंगचित्र वाद – सेनेचा इशारा

आवाज न्यूज लाईन

‘मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सामना’मधील व्यंगचित्राचा वाद पेटवणाऱ्या समाजकंटकांचा पर्दाफाश केल्यानंतर निवळलेले वातावरण पुन्हा पेटवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे करत आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा विघ्नसंतोषीपणा जनता खपवून घेणार नाही’, असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे.

शिवसेनेचं राज्य संपर्क कार्यालय शिवालय येथून एक प्रसिद्धी पत्रक काढून सुभाष देसाई यांनी विखे-मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे. ‘मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून काँग्रेस-राष्ट्रवादीवालेच आहेत. १५ वर्षे सत्ता भोगताना त्यांनी मराठा समाजासाठी ना ठोस योजना आखली ना आरक्षणाची अंमलबजावणी केली. कोर्टात यांच्यामुळेच नामुष्कीची वेळ आली आणि आता हे सारं लपवण्यासाठीच ते शिवसेनेवर आगपाखड करत आहेत’, असा आरोप देसाई यांनी केला.
विखे आणि धनंजय मुंडे यांना मराठा मोर्चाचे डौलाने फडकणारे भगवे झेंडे बघवत नसावेत. त्यातूनच त्यांना हा पोटशूळ उठलेला दिसतो, अशी तोफही देसाई यांनी डागली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दर्शविलेला आहे. शिवसैनिकही या मोर्चांच्या आयोजकांना सहकार्य करत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे सर्वकाही सुरळीत सुरू असताना विखे-मुंडे जोडी विघ्नसंतोषीपणा करत असेल तर जनता ते खपवून घेणार नाही, असा इशाराही देसाई यांनी दिला.

उद्धव यांनी माफी मागावी

सामनात छापलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाज, महिला, सैनिक, पोलीस आणि शहिदांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन ‘सामना’वर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून विखे-मुंडे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

भाजपनेही साधला निशाणा

मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी सामनातील व्यंगचित्राचा निषेध केला. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर टीका करताना या व्यंगचित्राबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शेलार यांनी केली.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *