facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / कुरनूर धरणावर आवो जावो घर तुमारा अशी स्तिथी बघायला मिळतीय
akkal-kot

कुरनूर धरणावर आवो जावो घर तुमारा अशी स्तिथी बघायला मिळतीय

(अक्कलकोट ) सीमेवरील दहशदवाद आणि नवी मुंबई उरण येथे शाळकरी मुलांना दिसलेले संशयास्पद दहशदवादी यामुळे सध्या राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय.असे असतानादेखील शंभर टक्के भरलेल्या सोलापूर येथील अक्कलकोट मधील कुरनूर धरणावर आवो जावो घर तुमारा अशी स्तिथी बघायला मिळतीय

उरी येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशवाद्यांनी हल्ला केल्याने लष्कराच्या १८ जावं बहाद्दरांना बलिदान द्यावे लागले.उरी येथून भारतात घुसकोरी करणाऱ्या कारवाया लष्करांनी हाणून पडल्यात. अशातच नवी मुबई च्या उरण येथे शाळकरी विध्यार्थ्यांना काही संशयास्पद दहशवादी आढळून आले.या घटनांमुळे राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय.राज्यातील महत्वाच्या ठिकाणा , मंदिरांना चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.मात्र सोलापूर जिल्हातील अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील शंभर टक्के भरलेल्या धरणावर आवो जावो घर तुमारा अशी अवस्था झालीय.धरण भरले आहे.हाय अलर्ट सुद्धा आहे. मात्र पाणी पाहण्यासाठी लोक लांबून येत असल्याने त्यांना सोडण्यात येतंय अशी उत्तर येथील सुरक्षा रक्षक देत आहेत.

या धरणावर मन मानेल अशा ठिकाणी उभे राहून बाहेरून आलेले लोक फोटो शेशन करत आहेत.धरणावर मोठ्या प्रमाणात रहदारी बघायला मिळत आहे.धरणावर जाण्यापासून कुणाला ही रोखण्यात येत नाही.असे सर्व असून सुद्धा धारण सुरक्षित आहे अशीच ग्वाही येथील पाटकरी देतात.

          धरणाला नेहमी चोख व्यवस्था असते मात्र इथं शंभर टक्के धारण भरून देखील सुरक्षा बघायला मिळत नाही.धरणावरील सौर ऊर्जेच्या पथ  दिव्यांच्या ब्याटरी , काचा , वायरी चोरी झाल्यात आता याकडे कोण बघणार.धरणाची सुरक्षा तर राम भरोसेच म्हणावे लागेल.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *