facebook
Sunday , December 4 2016
Home / पुणे / थकबाकीदारांना पुन्हा पालिका देणार ‘अभय’
pmc

थकबाकीदारांना पुन्हा पालिका देणार ‘अभय’

आवाज न्यूज लाईन

पुणे:मिळकतकर थकबाकीदारांसाठी गेल्या आर्थिक वर्षात जाहीर केलेल्या ‘अभय योजने’चे पुढील दोन महिन्यांसाठी पुन्हा पुनरागमन होणार आहे. या मुदतीमध्ये थकबाकीदारांना पुन्हा ५० ते ७५ टक्क्यांपर्यंतच्या सवलतीचे आमिष दाखवण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून ही योजना अंमलात आणण्याचा मिळकतकर विभागाचा प्रस्ताव आहे.
सर्वसामान्य थकबाकीदारांपासून ते आयटी आणि मोबाइल कंपन्यापर्यंत अनेकांकडे पालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मिळकतकर विभागाकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत, अशी टीका करून पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला होता. मिळकतकराच्या निव्वळ थकबाकीचा आकडा तब्बल १ हजार २६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे, थकबाकी वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा ‘अभय योजना’ राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या वर्षी ११ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ही योजना राबविण्यात आली होती. त्यातून, महापालिकेला तब्बल ३८५ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. त्यामुळे, प्रथमच मिळकतकराच्या उत्पन्नाने एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता.
१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना दंडावर ७५ टक्के सूट दिली जाणार आहे. तर, त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत कराची थकबाकी भरणाऱ्या नागरिकांना दंडावर ५० टक्के सूट दिली जाईल.

Check Also

news-5

शिवसेना हा केवळ टक्केवारीचा पक्ष

आवाज न्यूज नेटवर्क – पुणे – ‘शिवसेनेने महाराष्ट्रात जी कामे केली, ती बाळासाहेबांनी केली आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *