facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / नवरात्रीसाठी बाजारपेठ सज्ज
showimageinstory

नवरात्रीसाठी बाजारपेठ सज्ज

आवाज न्यूज लाईन

येत्या शनिवारपासून (१ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी शहरातील बाजारपेठही सजली आहे. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून ही खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे.

शक्तीचे प्रतीक असणारा नवरात्र उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने घरोघरी घटस्थापना करण्यात येते. काही जण मातीच्या घटाबरोबरच देवीच्या प्रतिकात्मक मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करतात. हा उत्सव सुरू होण्यास अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्यामुळे बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यामध्ये घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फेटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी करण्यास महिलांचे प्राधान्य आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये साहित्याच्या किमतीमध्ये कोणताही फरक झाला नसल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *