facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / रिक्षा पेटल्याने नऊजण जखमी
17

रिक्षा पेटल्याने नऊजण जखमी

आवाज न्यूज लाईन

लोकमान्य टिळक टर्मिनलहून गोवंडीच्या शिवाजीनगर येथे जाणा‍ऱ्या सीएनजी रिक्षातील गॅस लीक झाल्यामुळे पेटलेल्या रिक्षातील ९ जण जखमी झाले. रविवारी मध्यरात्री ही घडना घडली असून जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात अपघाताची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनल येथे खतिजा अब्दुल कुरेशी, साजीदा कुरेशी, फिरदोस कुरेशी हे शिवाजी नजर येथे जाण्यासाठी शरीफ शेख यांच्या रिक्षात बसले होते. कुरेशीसोबत त्याची चार अल्पवयीन मुले देखील यावेळी रिक्षात होती. शरीफ रविवारी मध्यरात्री सर्वांना घेऊन अहिल्याबाई होळकर मार्ग, हिंदुस्तान बँकेजवळ आला असताना अचानक रिक्षातील सीएनजी लीक झाल्यामुळे रिक्षाने पेट घेतला.
भरगाव वेगात असलेली रिक्षा तातडीने थांबवता येणे शक्य नव्हते. त्यामुळे वेग कमी करेपर्यंत मोठा भडका उडाला. त्यामुळे रिक्षातील ९ जण गंभीर भाजले. स्थानिकांनी वेळीच अग्निशमन दलाला बोलवले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहे

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *