facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / सोलापुरातील मुस्लिम तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तान सरकारचा निषेध
solapur

सोलापुरातील मुस्लिम तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तान सरकारचा निषेध

प्रतिनिधी – नागनाथ सुतार

सोलापुरातील मुस्लिम तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तान सरकारचा निषेध करत इंडियन आर्मीतील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहलीय.उरी येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशदवाद्यांच्या हल्यात भारतीय आर्मीतील जवानांना आपले प्राण गमवावे लागले.त्या अनुषंगाने सोलापुरात मुस्लिम समाजातील तरुणांनी येथील चार पुतळा परिसरात आंदोलन करत पाकिस्तान मुर्दाबाद , नवाज शरीफ हाय हाय च्या घोषणा दिल्या.यावेळी शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रत्येक वेळी आपला शब्द बदलणाऱ्या पाकिस्तानवर भारत सरकारने विश्वास न ठेवता पाकिस्तान विरुद्ध कारवाई करावी.पाकिस्तान विरोधी कारवाईत भारतातील तमाम मुस्लिम समाज भारत सरकार बरोबर आहे.प्रसंगी मुस्लिम समाज आपल्या छातीवर गोळ्या झेलील मात्र पाकिस्तानचे वाईट विचारांना यशस्वी होऊ देणार नाही असे मत मुस्लिम तरुणांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *