facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / ३७० कलम रद्द हीच हुतात्म्यांना आदरांजली
36

३७० कलम रद्द हीच हुतात्म्यांना आदरांजली

आवाज न्यूज लाईन

‘भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली पाहिजे. तसेच काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, असे सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिले पाहिजे. हीच उरी हल्ल्यातील शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे मत ऑल इंडिया अॅन्टी टेररिझम फ्रंटचे चेअरमन मणिंदरजीत सिंग (एम. एस.) बिट्टा यांनी सोमवारी व्यक्त केले. आवाज न्यूज लाईन

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलातर्फे ‘ऑल इंडिया अँटी टेररिझम फ्रंट’चे चेअरमन मनिंदरजीत सिंग (एम. एस.) बिट्टा यांच्या विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट, सरचिटणीस प्रवीण बाराथे, जैन महाशक्ती संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया अॅन्टी टेररिझम फ्रंटचे पुणे प्रतिनिधी म्हणून राहुल भंडारी यांची निवड करण्यात आली असल्याचे बिट्टा यांनी जाहीर केले.
‘भारताने प्रत्येक वेळी सहनशक्ती आणि सहिष्णुता दाखवूनही पाकिस्तानने आपल्या भूमिकेत बदल केला नाही. उरी हल्ल्यामुळे भारतात सर्वत्र शोक आणि संतापाचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले गेले पाहिजे,’ असे बिट्टा यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक पटलावरची प्रतिमा उंचावली आहे. तसेच देशाच्या सीमा देखील सुरक्षित झाल्या आहेत, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे बिट्टा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *