facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / कोंढव्यात सर्वाधिक डेंगी

कोंढव्यात सर्वाधिक डेंगी

कोंढवा वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २८०५ ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने

आवाज न्यूज लाईन

पुणे : सध्याच्या उन्हामुळे डेंगीचे डास वाढण्याची भीती असताना शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर प्रशांत जगताप यांच्या कोंढवा – वानवडी भागात सर्वाधिक २८०५ ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील सुमारे साडेआठ हजार मिळकतीमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. पुणे शहरात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. उन्हामुळे डेंगीचे डास अधिक वाढण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. डासांपासून डेंगी, चिकुनगुनियाचा आजार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक सकस आहार घेण्याचा, फळ, पालेभाज्या खाण्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
डेंगी, चिकुनगुनिया वाढत असल्याने त्यादृष्टीने धूर फवारणी आणि औषध फवारणीची उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही शहराच्या विविध भागांत डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखावी, फ्रीज, कुंड्या, गॅलरीत साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची अंडी नाहीत, याची खातरजमा करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. पुण्यात २३ जणांना डेंगीची लागण झाली असून संशयित १८७५ पेशंट आढळले आहेत. त्याशिवाय ३८५ जण पॉझिटिव्ह पेशंट आढळले आहेत. चिकुनगुनियाचे एकही पेशंट मंगळवारी आढळला नाही.
शहरात आतापर्यंत साडेआठ हजार मिळकतींमध्ये डेगींच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. त्यापैकी महापौर प्रशांत जगताप यांच्या कोंढवा वानवडी भागात सर्वाधिक डेंगींच्या डासांची अंडी आढळली आहेत. त्या भागात २८०५ एवढी अंडी सापडली आहेत. त्यापाठोपाठ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १३०८ एवढ्या ठिकाणी डासांची अंडी सापडली आहेत. त्याशिवाय नगररस्ता, ढोले पाटील रस्ता, विश्रामबाग वाडा, भवानी पेठ, कोथरुड या भागात सर्वाधिक डेंगीच्या डासांची अंडी आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. या साठेआठ हजार मिळकतींमध्ये अंडी सापडल्याने तीन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत १२ लाख ९७ हजार १७२ एवढ्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *