facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / विद्यार्थ्यांनी दिली मतदान जागृतीची हाक

विद्यार्थ्यांनी दिली मतदान जागृतीची हाक

आवाज न्यूज लाईन

मुंबई :सध्याच्या युवा वर्गात मतदानासंदर्भात जागृती निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थी वर्ग पुढे सरसावला आहे. मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी सोमवारी घाटकोपर येथील रामजी आसार विद्यालय संचालित गोलवाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विशेष महारॅली काढली. मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली होती. ज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मधील निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सोमवारी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद‍्घाटन संस्थेचे अध्यक्ष धीरुभाई मेहता व एन विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुधांशु द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. त्यावेळी निवडणूक विभागाचे निरीक्षक सत्यवान मेस्त्री, कॉलेजचे प्राचार्य प्रा. ए. डी. वंजारी, संस्थेचे सचिव देवेंद्रभाई शहा, एन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भोसले उपस्थित होते.

या रॅलीत कॉलेजातील राष्ट्रीय सेवा योजना विभागासह तन्ना ज्युनिअर कॉलेज व एमडी भाटीया हायस्कूल यांच्याही शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या रॅलीमध्ये जवळपास ३००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, जनजागृती व मतदार नोंदणीबाबतच्या प्रभावी घोषणा यामुळे सर्व परिसर नागरिकांचे आकर्षण ठरले होते. ही रॅली लक्ष्मीबाई गोलवाला कॉलेजकडून राजावाडी हॉस्पिटलमार्गे गुरुकुल कॉलेजकडून घाटकोपर पूर्व विभागात काढण्यात आली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *