facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / शेतमाल निर्यातीला बूस्टर

शेतमाल निर्यातीला बूस्टर

पुणे : अंजीर, सीताफळ, डाळिंब, चिक्कू या फळांबरोबर विविध फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील फळांना कार्गो विमानतळामुळे निर्यातसंधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊन फळ उत्पादकांना जोडधंद्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

पुरंदर तालुक्यात वर्षानुवर्षे जिरायतीबरोबर बागायती शेती केली जात आहे. कालांतराने पडलेल्या दुष्काळामुळे फळबागा नष्ट झाल्या. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरंदर तालुक्यात राजेवाडीच्या अंजीरबरोबर सीताफळ, चिक्कू, डाळिंब या फळांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कार्गो विमानतळ उभारणीच्या प्रस्तावामुळे फळ उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘पुरंदर तालुक्यातील राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहेत. युरोपातील महत्त्वाच्या देशांना कार्गो विमानतळाच्या माध्यमातून दररोज फळे निर्यात करणे शक्य होईल. पश्चिम भारतातील शेतकऱ्यांसाठी येथे कार्गो हब तयार होईल. गुणवत्तापूर्ण डाळिंबाची देखील निर्यात होऊ शकते. डेअरी उत्पादनासाठी जगाची बाजारपेठ काही तासांच्या अंतरावर उपलब्ध होईल,’ अशी माहिती शेतकरी नितीन कुंजीर यांनी ‘मटा’ला दिली.
‘पुरंदर तालुक्यात वाघापूर, पारगाव मेमाणे, राजेवाडी, अंबवडे येथे सुमारे ४० ते ५० पॉलिहाउस आहेत. कार्गो विमानतळामुळे पुरंदर तालुक्यासह शेजारील सातारा, सांगली, सोलापूर तसेच तळेगाव दाभाडे भागातून फुलांची निर्यात करण्याची संधी मिळणार आहे. फूल उत्पादकांना चांगला दर मिळेल, तसेच नवी बाजारपेठही मिळेल. त्यामुळे तालुक्यात विमानतळ होण्याची आवश्यकता आहे,’ अशी प्रतिक्रिया फूल उत्पादक शहाजी कुंजीर यांनी दिली.

चाकण परिसरात विमानतळ होणार असल्याच्या शक्यतेने काही वर्षांपूर्वी तेथे मोठ्या कंपन्या स्थिरावल्या. आता पुरंदरला विमानतळ होणार असल्याने त्या बहुराष्ट्रीय कंपन्या तालुक्यात येतील. अंजीर, सीताफळांसह अन्य फळांची निर्यातीला मार्ग मोकळा होईल. शेतकऱ्यांना थेट नवी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसेच नवा ग्राहक उपलब्ध होईल.
सुनील कुंजीर, सदस्य, ग्रामपंचायत वाघापूर

स्थानिकांच्या उत्पन्नात भर
पुरंदरला कार्गो विमानतळ झाल्यानंतर मोठमोठ्या कंपन्या येतील. त्यांच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या निवासापासून ते खाण्यापिण्यापर्यंतची सुविधा उपलब्ध करावी लागेल. त्याशिवाय तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी हॉटेल, लॉजिंगची गरज भासणार आहे. त्यामुळे भविष्यात या सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सुविधांसंदर्भात विविध पूरक व्यवसाय करण्याची संधी स्थानिक तरुणांना मिळणार आहे. सुमारे २० ते २५ हजार तरुणांना रोजगारांची संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *