facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / टीएमटी पुन्हा वादात!
tmt

टीएमटी पुन्हा वादात!

आवाज न्यूज लाईन

ठाणे : टीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या बसच्या संचलनासाठी दिलेल्या ठेक्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी पालिका सभागृहात गोंधळ घातला. या विषयावरील चर्चेसाठी महापौरांनी वेळ न दिल्याने संतापलेल्या नगरसेवकांनी महापौरांनाच घेराव घालून निषेध नोंदविला. त्यानंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत या गैरव्यवहाराच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असून त्याबाबतची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली आहे.

जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत टीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या १९० बसपैकी काही बसचे मॉडेल बदलण्यात आले असून त्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात मंजुरीसाठी आला होता. या बस खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून चालविल्या जाणार असून तो ठेका देताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी सुरुवातीला केला होता. नवी मुंबईने व्होल्वो बससाठी प्रति किमी ५९ रुपये दर दिला असून ठाण्याचा दर ६६ रुपये आहे. तर मीडी बससाठी नवी मुंबई ३१ रुपये अदा करत असताना ठाणे पालिकेने ५३ रुपये देण्याचे मान्य केल्याचे नजीब मुल्ला यांनी सांगितले. तर, नवी मुंबईने १४० बसेससाठी २७ कोटी रुपये अनामत रक्कम घेतली असताना ठाण्यात मात्र, १९० बससाठी सव्वापाच कोटी रुपयेच घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून त्याबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक करत होते. मात्र, नवी मुंबईच्या आधी आपण निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्याला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर अटीशर्थी बदलल्यानंतर स्पर्धात्मक पद्धतीनेच हे काम देण्यात आल्याचा खुलासा टीएमटीचे व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी केला. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक होते. मात्र, महापौरांनी त्या विषयावर केवळ पाच मिनिटे चर्चा करून सभा तहकूब केली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या ठेक्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला. हा गैरव्यवहार उघड होऊ नये यासाठी महापौरांनी सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी केला.

Check Also

boat

कोकणात जाऊ या…बोटीने!

मुंबईः सणासुदीच्या दिवसात ओसंडून वाहणाऱ्या एसटी आणि खासगी टुरिस्ट बसेस… खराब रस्त्यांमुळे प्रवासासाठी लागणारा बारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *