facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / साथीच्या आजारांचे मुंबईत थैमान
34

साथीच्या आजारांचे मुंबईत थैमान

आवाज न्यूज लाईन

मुंबई : डेंग्यू, मलेरियासह साथीच्या अनेक आजारांनी सध्या मुंबईत थैमान माजवले आहे. सरकारी, पालिकेच्या रुग्णालयांतील वॉर्ड रुग्णांनी भरून गेले असून, खाटा भरल्यामुळे जमिनीवर बिछाने घालून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयांचेही वॉर्डही तापाच्या रुग्णांनी भरून गेले आहेत. ज्येष्ठ नागरिक, मधुमेही, बालके, गरोदर महिला व रोगप्रतिकारशक्तीचा अभाव असलेल्या व्यक्तींसाठी सध्याचा काळ अतिशय घातक असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

पालिकेच्या सायन रुग्णालयातील पन्नास खाटांच्या एका वॉर्डमध्ये सुमारे १५६ रुग्ण दाखल आहेत. नायर व केईएम रुग्णालयांतील परिस्थितीही फार वेगळी नाही. खासगी रुग्णालयात तर खाटाच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. खाटा मिळण्यावरून रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वादावादी सुरू झाली आहे.

एकाच वेळी डेंग्यू-मलेरियाची लागण

साथींच्या आजारामुळे मुंबईकरांमध्ये घबराट उडाली आहे. काही रुग्णांमध्ये डेंग्यू व मलेरियाची एकाचवेळी लागण झाल्याचे दिसून आल्यामुळे आरोग्य खात्यामध्येही चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत तापाची लक्षणे असलेल्या दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. संसर्गजन्य ताप असला तरीही डेंग्यू-मलेरियाच्या चाचणीसाठी रुग्णच अनेकदा डॉक्टरांना आग्रह करीत असल्याचे चित्र आहे.
आजारांसाठी पोषक वातावरण

मुंबईतील वाढलेले तापमान व आर्द्रता, पाऊस व लोकसंख्येची घनता या कारणांमुळे संसर्गजन्य आजार फैलावण्यास सध्या अतिशय पोषक वातावरण असल्याचे संसर्गजन्य आजारांविषयक सल्लागार डॉ. ओम श्रीवास्तव सांगतात. सध्या मलेरियाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पाऊस संपल्यावर पुढे तीन ते पाच आठवडे असा धोका राहू शकतो.

 

 

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *