facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / मंगळ मोहिमेच्या नोंदी सर्वसामान्यांसाठी खुल्या
28

मंगळ मोहिमेच्या नोंदी सर्वसामान्यांसाठी खुल्या

आवाज न्यूज लाईन

पुणे : c. स्वदेशी मोहिमेच्या या नोंदींच्या आधारे देशभरातील अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मंगळाच्या विविध पैलूंवर संशोधन करावे, असे आवाहन इस्रोने केले आहे.
‘पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर आणि आणि सूर्यमालेतील एखाद्या ग्रहाच्या कक्षेत अवकाशयान पाठवण्याची आपली तांत्रिक क्षमता तपासणे’, हे मंगळ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत आपले यान प्रस्थापित करण्याचा बहुमान मिळवतानाच भारताने मंगळ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट साध्य केले. मंगळ मोहिमेचे सर्वसाधारण आयुष्य सहा महिने अपेक्षित असताना दोन वर्षे पूर्ण होऊनही यान सुस्थितीत असून, त्याचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. दोन वर्षांहून अधिक कार्यकाळ मिळाल्यामुळे मंगळावर ऋतूंनुसार होणारे बदल यानाला टिपता येणार आहेत. सरकारी निधीमधून उभ्या राहिलेल्या या अवकाश मोहिमेच्या पहिल्या वर्षीच्या नोंदी आता नियमानुसार सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

मॉमवर बसवण्यात आलेल्या मेनका, लॅप, एमसीसी, एमएसएम आणि टीआयएस या पाचही उपकरणांनी २४ सप्टेंबर २०१४ ते २३ सप्टेंबर २०१५ या वर्षभराच्या कालावधीत घेतलेल्या शास्त्रीय नोंदी अभ्यासक आणि सर्वसामान्यांसाठी मोफत खुल्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढील काळातील सहा-सहा महिन्यांच्या नोंदीही येत्या काळात खुल्या करण्यात येतील, अशी माहिती इस्रोने दिली आहे. या नोंदींमध्ये मंगळाच्या भूपृष्ठाची वर्षभराच्या कालावधीत घेतलेली छायाचित्रे, मंगळाच्या वातावरणातून अवकाशात निसटणाऱ्या हलक्या वायूंच्या प्रमाणाच्या नोंदी, मंगळावरील संभाव्य जीवसृष्टी वर्तवणाऱ्या मिथेन बहुल ठिकाणांची माहिती, मंगळाच्या भूपृष्ठावरील खनिजांच्या नोंदी याशिवाय वर्षभराच्या कालावधीत मंगळाच्या वातावरणात आणि भूपृष्ठावर झालेले बदल आदी माहितीचा समावेश आहे. या शास्त्रीय नोंदी वापरून अभ्यासकांनी मंगळाच्या विविध पैलूंवर संशोधन करावे, असे आवाहन इस्रोने केले आहे.
या नोंदींचा संग्रह पाहण्यासाठी अभ्यासकांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदींवर आधारित संशोधन प्रसिद्ध करताना इस्रोच्या मंगळ मोहिमेचा संदर्भ देणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी इस्रोची वेबसाइट www.isro.gov.in पाहावी.

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *