facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – राधाकृष्ण विखे पाटील
16

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – राधाकृष्ण विखे पाटील

आवाज न्यूज लाईन

मुंबई : मराठा समाजाच्या मोर्चांबाबत ‘सामना’मध्ये प्रकाशित झालेले व्यंगचित्र अतिशय संतप्त करणारे व आक्षेपार्ह आहे. या व्यंगचित्रातून केवळ मराठा समाजाचाच नव्हे तर सर्वच समाजातील महिला, शहीद व पोलिसांचा अवमान झाला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच शिवसेना हा पक्ष मराठाविरोधी असल्याचे यातून स्पष्ट झाल्याचे विखे म्हणाले.
‘सामना’तील व्यंगचित्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, या व्यंगचित्रामुळे मराठा समाजामध्ये अतिशय संतापाची भावना निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर विविध मोर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांच्या हेतूवर असभ्य व अशोभनीय भाषेत शंका व्यक्त करून या व्यंगचित्रामधून महिलांचा अवमान झाला आहे. शिवसेना हा पक्ष दलितविरोधी आणि मुस्लिमविरोधी असल्याचे अगोदरपासूनच माहिती होते, परंतु शिवसेना मराठाविरोधीही असल्याचे या व्यंगचित्रातून उघड झाले आहे.

या व्यंगचित्राची जबाबदारी स्विकारून स्वतः उद्धव ठाकरे जाहीर माफी मागणार नसतील तर सरकारने ‘सामना’विरुद्धची पहिली कारवाई म्हणून ‘सामना’च्या शासकीय जाहिराती बंद करण्याची घोषणा करावी आणि ‘सामना’तील व्यंगचित्राशी सरकार सहमत नसेल तर सरकारने ही कारवाई तातडीने सुरू केली पाहिजे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचा अपमान करणारं व्यंगचित्र छापून दैनिक सामनानं मराठा समाजाचा अपमान केलाय. समाजाच्या भावना यावर तीव्र असून दैनिक सामनानं प्रथम माफी मागावी, असा इशारा ठाणे येथील मराठा क्रांती मुक मोर्चाच्या आयोजकांनी दिला आहे.
शिवसेनेचा निषेध
मराठा आरक्षणासारख्या गंभीर विषयाची टिंगल टवाळी करून, या मोर्चात सहभागी होणाऱ्या लाखो माता-भगिनींचा व्यंगचित्र काढून अवमान करणाऱ्या शिवसेनेचा निषेध असून शिवसेनेने या प्रकरणाबद्दल तातडीने माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *