facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / खंडणीचे ‘मल्टिलेव्हल टार्गेटिंग’

खंडणीचे ‘मल्टिलेव्हल टार्गेटिंग’

सध्याच्या मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या जमान्यात खंडणीखोर कुख्यात डॉननेसुध्दा त्याच पद्धतीचा अवलंब करत मल्टिलेव्हल टार्गेटिंगचा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. एका धनदांडग्याकडे खंडणी मागायची, त्यानंतर ती निम्मी करण्याच्या मोबदल्यात खंडणी देऊ शकतील, अशा दोन धनदांडग्यांची नावे आणि फोन नंबर घ्यायचे, असा हा नवा फंडा सुरू झाला आहे. पुजारी टोळीकडून तो अवलंबला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे.

उल्हासनगरातील काही व्यापाऱ्यांना खंडणीसाठी पुजारी टोळीकडून धमकावले जात होते. त्यानंतर ठाणे खंडणीविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने तपास करत या टोळीतील विजय पुजारी, पप्पू उर्फ यश पाटील, मिथून करमोकर, दयानंद पुजारी, विष्णू उर्फ सोनी तेजवानी या तीन गुंडांच्या मुसक्या आवळल्या. विजय या टोळीचा ठाण्यातला म्होरक्या असून ठाण्यासह पालघर, पनवेल आणि नवी मुंबईमध्ये खंडणीच्या गुन्ह्यांसाठी हस्तक तयार करणे आणि खंडणी देऊ शकतील अशा धनदांडग्यांची माहिती गोळा करण्याचे काम त्याच्याकडे होते. त्याच विजयने पोलिस तपासादरम्यान पुजारी टोळीकडून सुरू असलेल्या ‘मल्टिलेव्हल टार्गेटिंग’चा फंडा उघड केला.

धनदांडग्यांची खबर पुजारीला दिल्यानंतर ‘भाई’ स्वतः परदेशातून धमकीचे फोन करतो. सुरुवातीला मोठी खंडणीची रक्कम मागितली जाते. त्यात मांडवली करण्याचे आर्जव व्यापारी किंवा बिल्डरने केल्यानंतर ती रक्कम निम्मी करण्याची तयारी ‘भाई’ दाखवतो. मात्र, त्या बदल्यात खंडणी देऊ शकतील, अशा दोन बड्या आसामींची नावे आणि नंबर त्यांच्याकडून ‘भाई’ घेतो. हेच दोन आसामी ‘भाई’चे पुढचे टार्गेट असते, अशी माहिती विजयने दिल्याची माहिती पोलिस दलातील विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे. पुजारीला नवे संपर्क दिले की तो खंडणीची रक्कम कमी करतो ही बाब आता व्यापारी आणि बिल्डरांपर्यंतही पोहचली आहे. त्यापैकी काही जणांनी आपले वैयक्तिक सूड उगवण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांचे फोन नंबर देत आपली खंडणीची रक्कम कैक पटीने कमी करून घेतल्याचेही सांगितले जात आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *