facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / तर चोरी गेले असते साडेसहा कोटींचे दागिने

तर चोरी गेले असते साडेसहा कोटींचे दागिने

आवाज न्यूज लाईन

नागपूर : भीमचौक येथील मणप्पूरम् गोल्ड लोनमध्ये चोरी करण्याचा गोल्डन गँगचा प्रयत्न फसला नसता तर अकरा महिन्यांपूर्वीच येथून साडेसहा कोटींचे दागिने चोरीला गेले असते. मात्र कटरचे ब्लेड तुटल्याने हा प्रयत्न फसला होता.नोव्हेंबर महिन्यात हुडकेश्वर पोलिसांनी दिल्लीच्या गोल्डन गँगमधील अमित दर्यासिंग (वय २८, रा. जोहरीपूर, सिकंदराबाद, दिल्ली) आणि प्रियंका सहदेवसिंग ठाकूर (वय २७, रा. सुलेमाननगर, अमनविहार, दिल्ली) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर हा खुलासा झाला होता.

गोल्डन गँगचा सूत्रधार इक्राम ऊर्फ समीर अब्दुल गनी आहे. याच टोळीतील मोबीन हा तिजोरी फोडण्यात ‘तरबेज’ आहे. या टोळीने जरीपटक्यातील नारी मार्गावरील भीमचौक येथील मणप्पूरम् गोल्ड लोनच्या कार्यालयातील तिजोरी फोडण्याचा कट आखला होता. त्यासाठी रोहित नावाच्या युवकाची मदत घेतली होती. प्रियाने येथील चौकीदाराशी ओळखही केली होती. ४ ऑक्टोबरला मणप्पूरम्‍मध्ये दरोडा टाकण्याची योजना या टोळीने आखली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही टोळी तेथे गेली. प्रियाने चौकीदाराला चहा दिला. चहा प्यायल्यानंतर चौकीदार बेशुद्ध झाला होता. त्यानंतर ते कार्यालयात घुसले. कटरने तिजोरी कापायला सुरुवातही केली. मध्येच कटरचा ब्लेड तुटल्याने जोरदार आवाज झाला. ते घाबरले. पकडल्या जाण्याच्या भीतीने त्यांनी तेथून पळ काढला. ब्लेड तुटले नसते तर साडेसहा कोटींच्या दागिन्यांवर तेव्हाच ‘हात साफ’ झाला असता. सध्या येथे चौकीदार नाही.

अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा संशय

अतेरिकी कारवायासाठी दागिने लुटण्याची पद्धत अतिरेकी संघटनांची आहे.यापूर्वी २०११मध्ये मध्य प्रदेशातील तीन बँकांमध्ये अशाच प्रकारे दरोडा टाकण्यात आला होता. याचा वापर देशविघातक कारवायासाठी करण्यात आला होता. प्रतिबंधित संघटना सीमा व इंडियन मुजाहिद्दीन या संघटना अशा प्रकारे लुटपाट करतात. नागपुरातील घटनेबाबत मात्र अशी शक्यता नाही, असे एटीएसचे म्हणणे आहे. दरम्यान, नाशिकमध्येही अशाचप्रकारे मणप्पूरम्‍मध्ये दरोडा टाकण्यात आला होता. या दरोडेखोरांच्या टोळीला कल्याणमध्ये अटक करण्यात आली होती.

अलार्मनंतरही कुणीच आले नाही

नागपूर : मणप्पूरम् गोल्ड लोनमध्ये सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी ३१ किलो सोन्याचे दागिने व तीन लाखांची रोख लुटून नेल्यानंतर खोलीत असलेल्या ग्राहक व कर्मचाऱ्यांने अलार्मचे स्विच तोडले. दोन वायर जोडले. अलार्म वाजला. मात्र दहा मिनिटांपर्यंत कुणीही आले नाही. अखेर त्यांनी आरडाओरड केली. सुमारे दहा मिनिटांनी एक ग्राहक आला. त्याने दरवाजा उघडला. त्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याच्या बॅगमधील मोबाइल काढून पोलिसांना माहिती देण्यात आली. अलार्म वाजल्यानंतरही कुणीच न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ग्राहक दहशतीत

दरोडा पडल्याची माहिती मिळताच शेकडो ग्राहकांनी भीम चौक येथे धाव घेतली. दरोडा पडल्याने दागिने परत मिळतील किंवा नाही याबाबत प्रत्येकजण चौकशी करीत होते. काहींनी रडायलाही सुरुवात केली. आजच पैसे जमवून गहाण ठेवलेले सोने सोडायला आलो होतो, असेही एकाने सांगितले.

सर्वात मोठा दरोडा

उपराजधानीत दिवसाढवळ्या घरात घुसून हत्या करण्यात येत आहे. दरोडा टाकण्यात येत आहे. वाढत्या घटनांनी नागपूरकर प्रचंड दहशतीत आहेत. अलीकडच्या काळातील दरोड्याची नागपुरातील ही सर्वांत मोठी घटना असल्याचे बोलले जाते.

मोटरसायकलवर आले, सीसीटीव्हीत अडकले

दरोडेखोर मोटरसायकलवर आले होते. चार जणांनी कार्यालयातील सीसीटीव्हीशी कनेक्ट असलेल्या सीपीयूची तोडफोड केली. मात्र हार्डडिस्क वाचली. याची पाहणी केली असता त्यात चार दरोडेखोर दिसत आहे. समोरील दुकानांतील सीसीटीव्हीत ते मोटरसायकलने आल्याचेही स्पष्ट झाले आहे. टीप देऊन हा दरोडा टाकण्यात आल्याचा संशयही पोलिसांना आहे. मणप्पुरम् गोल्ड लोनमध्ये चौकीदारही नाही.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *