facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आवाज न्यूज लाईन

औरंगाबाद : सुधाकरनगरजवळील तलावात मंगळवारी दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी दुपारी श्रीयश कॉलेजच्या मागे असलेल्या सातारा तांडा क्रमांक ३ येथील तलावात एमआयटी कॉलेजचे चिन्मय कुलकर्णी व विवेक चौधरी या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.
बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एमआयटी कॉलेजमधील डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्सच्या द्वितीय वर्गात शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांचा ग्रुप लंच टाइममध्ये झाला म्हणून सातारा तांडा क्रमांक ३ येथील तलावात पोहण्यासाठी गेला. विद्यार्थी श्रीयशच्या पार्किंगमध्ये गाड्या लावून पायी तलावाजवळ गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार; कंबरेचे बेल्ट जोडून ते पाण्यात उतरत होते. असे करीत असतानाच चिन्मय संजय कुलकर्णी (१७, रा. औदुंबर, प्लॉट क्रमांक ५४३, भारतमाता कॉलनी) व विवेक सुनील चौधरी (१८, रा. प्लॉट क्र. ६२, नाईकनगर, सूर्या लॉन्सजवळ) हे दोघे पाण्यात बुडाले. ते पाहून सोबतचे विद्यार्थी घाबरले व त्यांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकताच आजुबाजुला गुराख्यांनी तलावाजवळ धाव घेतली. पोलिस ठाण्याला व अग्निशमन दलाला माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याची टू मोबाइल व्हॅन व अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली.

दोघेही एकुलते एक
चिन्मय व विवेक आई-वडिलांचे एकुलते एक मुले होती. चिन्मय हा इलेक्ट्रॉनिक्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. चिन्मय हा उत्कृष्ट डान्सर होता. तो मित्रांना डान्सही शिकवत असे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *