facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / मनपातील लाचखोर लिपिकांना अटक

मनपातील लाचखोर लिपिकांना अटक

आवाज न्यूज लाईन

जळगाव : समतानगरातील तक्रारदाराच्या मिळकतीची घरपट्टी वडील व मुलांच्या नावाने विभाजित करून देण्यासाठी १५०० रुपयांची लाच घेताना महापालिका घरपट्टी विभागाच्या दोन लिपिकांना प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयात लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली.

समतानगरातील तक्रारदाराने त्याच्या मिळकतीच्या घरपट्टीचे दोन भागात विभाजन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यासाठी त्याने मेहरूण येथील प्रभाग समिती तीनच्या कार्यालयातील घरपट्टी लिपीक अशोक बंडू म्हसके व अशोक बळीराम सैंदाणे यांच्याकडे प्रकरण दिले होते. हे काम करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनतंर १५०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत केलेल्या तक्रारीवरून बुधवारी प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापाळा लावला. दुपारी सव्वा तीन वाजता १५०० रुपयांची लाच घेताना अशोक म्हसके व अशोक सैंदाणे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांच्या निवासस्थानांची तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *