facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / शहराला डेंग्यूचा विळखा

शहराला डेंग्यूचा विळखा

शहरातील वाढती अस्वच्छता, डासांची मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ आणि साचलेल्या पाण्यामुळे शहराला डेंग्यूचा मोठा विळखा असून दररोज डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही अपुऱ्या जागांचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक उपाय करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याने डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णांचीही नोंद केली जात आहे.

वातावरणात झपाट्याने होणारा बदल आणि शहरात फोफावणारी अस्वच्छता यांमुळे जून महिन्यापासून साथीच्या आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत असले तरी मागील महिन्यापासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये तीस ते पन्नास टक्के वाढ झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जाते. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय आखण्यात आले होते. सध्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरून या उपायांचा फारसा उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट होते. दर दिवशी खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयातही डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालयाची जागा अपुरी पडताना दिसते.

यंदाच्या पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून ५०६००९ पाण्याचे साठे तपासण्यात आले असून तब्बल २२८६७२ क्लोरिन गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचा दावा केला जातो. त्यामध्ये १५७८६ घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या होत्या. याबाबत शासकीय तसेच १७७ खासगी रुग्णालयांना माहिती देण्यात आली होती. मात्र उपायांच्या तुलनेत रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसतो.

गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढले आहे. जून ते सप्टेंबर या कालवधीत अवघ्या २५१ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोंदविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा आहे. याबाबत डॉ. दीपक वझे म्हणाले, ‘मागील वर्षीच्या तुलनेत डेंग्यू संशयित आणि बाधित रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसते. वारंवार सूचना देऊनही घरात होणारी पाण्याची साठवण आणि शहरातील अस्वच्छता यांमुळेच डेंग्यूने थैमान घातले आहे.’

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *