facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / मुंबई / सेनेतील राजीनामा नाट्यावर पडदा

सेनेतील राजीनामा नाट्यावर पडदा

मराठा मोर्चाची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र ‘सामना’त प्रसिद्ध झाल्यानंतर मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच शिवसेनेचे बुलडाण्यातील खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर या आमदारांनी राजीनामे ‌दिल्याच्या वृत्ताने मंगळवारी खळबळ उडाली. या तिघांनी राजीनामे देऊ केले होते; मात्र, त्यांनी बुधवारी सकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर या राजीनामा प्रकरणावर पडदा पडल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले.

‘सामना’तील त्या व्यंगचित्रकाराने दिलगिरी व्यक्त केली आहे. व्यंगचित्रामुळे जो गोंधळ निर्माण झाला होता तो आता दूर झाला आहे. खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चा करून आम्ही मार्ग काढला. शिवसेना आमदार-खासदारांनी राजीनामे दिलेच नव्हते. त्या केवळ अफवा होत्या’, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ‘मातोश्री’वरील बैठकीनंतर जाहीर केले.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथेच जिजाऊंचे जन्मस्थान आहे. ‘सामना’तील व्यंगचित्रावर राज्यभरातील मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच बुलडाणा येथे मराठा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यंगचित्राबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. या मोर्चानंतर शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांवर जनतेतून प्रचंड दबाव वाढू लागला होता. या व्यंगचित्रामुळे समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले जात होते. त्याविषयी ‘सामना’तून साधी दिलगिरीही व्यक्त होत नसल्याबद्दल मराठा तरुण प्रक्षुब्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर हे सगळे राजीनामानाट्य घडल्याचे बोलले जाते. त्यामुळेच या सगळ्याची तात्काळ दखल घेऊन उद्धव ठाकरे यांनी प्रतापराव जाधव, रायमूलकर आणि खेडेकर यांना भेटीसाठी बोलावले व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राजीनामा प्रकरणावर पडदा पडल्याचे जाहीर केले.

‌‌विशेष अधिवेशनासाठी उद्धव आज राज्यपालांना भेटणार?

मराठा मोर्चामधील मागण्यांचा विचार व्हावा यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी शिवसेनेची भूमिका असून, बुधवारी दुपारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत या विषयावर झाली. आज, गुरुवारी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भेट घेण्याची शक्यता असून, शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना त्यासाठी मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *