facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / आदिवासी टास्टेकवाडीत येणार वीज
235023352366-23112350238123462373232523812335

आदिवासी टास्टेकवाडीत येणार वीज

आवाज न्यूज लाईन

अहमदनगर : संगमनेर व अकोले तालुक्यांच्या हद्दीवर अकोले आदिवासी मतदारसंघातील अकलापूर ग्रामपंचायत हद्दीतील टास्टेकवाडी लवकरच विजेच्या दिव्यांनी प्रकाशमान होणार आहे. वीज मंडळाने आदिवासी विकास खात्याकडे यासंदर्भात ४ लाख २० हजारांचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच आदिवासी विकास खाते ठक्कर बाप्पा योजनेतून निधी देऊन टास्टेकवाडीला वीज पुरविणार आहे. मटाने यासंदर्भात १५ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.

देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली तरी टास्टेकवाडी हे गाव आजही अंधारात आहे. या वस्तीवर अजूनही वीज पोहोचलेली नाही. गावात मोबाइल आले पण वीज मात्र अद्याप या गावात पोहोचली नाही. त्यामुळे वस्तीवरील विद्यार्थ्यांना कंदील व चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत असल्याने येथे वीज पुरविण्याची मागणी ग्रामस्थ करीत होते. यासंदर्भात ग्रामपंचायतीने वीज मंडळाकडे प्रस्तावही पाठविला होता. आदिवासी टास्टेकवाडीची व्यथा मटाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर याबाबत वीज मंडळाने कार्यवाही सुरू केली व यासंदर्भात ४ लाख २० हजार रुपयांचा प्रस्ताव आदिवासी विकास खात्याकडे सादर केला आहे. त्यामुळे ३० घरे आणि १५० लोकांची वस्ती असलेल्या ठाकर समाजाची घरे आता लवकरच विजेच्या दिव्यांनी उजळणार आहेत.

एलटी लाइन टाकून टास्टेकवाडीला वीज दिली जाणार आहे. ठक्कर बाप्पा योजनेतून वीज मिळणार आहे. याबाबत वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता ठोंबरे यांनी सांगितले, आम्ही प्रस्ताव पाठविला आहे; मात्र, मंजुरी देणे आदिवासी विभागाच्या हातात असून तो निधी मंजूर झाला की वाडीला वीज जोडणी करता येईल.

आदिवासी विकास खात्याचे पाटील यांच्या टेबलवर फाइल असून त्यांच्याकडून फाइल मंजुरीसाठी पाठवून मंजुरी मिळाल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही होणार आहे. या वाडीला वीज मिळावी म्हणून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही याबाबत संबंधित खात्याशी संपर्क साधल्याचे समजते.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *