facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / पाणलोट घोटाळा : ५५ अधिकाऱ्यांवर ठपका
panlot

पाणलोट घोटाळा : ५५ अधिकाऱ्यांवर ठपका

आवाज न्यूज लाईन

कोल्हापूर : ‘पाणलोट’ योजनेतून झालेल्या कामांची जागेवर जावून पाहणी व तपासणी न करणे, नियमबाह्य कामांना मंजुरी, चुकीच्या ठिकाणी निकृष्ट बंधारे घेऊ नये, याकडे लक्ष न देणे असे ठपके असलेल्या कृषी विभागाच्या ५५ अधिकारी, २० गाव समिती सचिवांची चौकशी झाली आहे. मात्र वर्षानंतरही ते ठोस कारवाईपासून मोकाट आहेत. चौकशी अहवाल माध्यमांसह पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या लोकप्रतिनिधींपासून दडवला. अहवाल दडपण्याचा नियोजनबद्ध कट कृषी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाल्याचेही उघड झाले आहे.

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेतून (वसुंधरा पाणलोट) प्रत्येक थेंब माथा ते पायथा अडवून जिरवण्यासाठी लहान, मोठे बंधारे बांधणे, गावातील शेतकरी, बारा बलुतेदारांना स्वंयपूर्ण करण्याचा मुख्य उद्देश आहे. परंतु, गाव समित्या आणि ठेकेदारांना हाताशी धरून अनेक कृषी अधिकाऱ्यांनी पैसे मुरवले. यामुळेच ‘पाणलोट’च्या कामांत सुमारे ३० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधानसभेत १८ जुलै २०१५ रोजी झाली.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. देशमुख यांनी समिती सदस्यांना घेऊन अनेक गावांना भेट देऊन कामाची पाहणी केली, अहवाल तयार केला.

अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पाणलोट कक्ष तथा ‌माहिती केंद्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे दिला. अहवाल देऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीही ठपका असलेले अधिकारी गंभीर कारवाईपासून दूरच आहेत. केवळ जुजबी नोटीस दिल्या आहेत. विधानसभेत या योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा ज्यांनी पोहचवला तेही दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करत नाहीत, यामागचे गोडबंगाल काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करणाऱ्यांना दोषी अधिकारी थेट, भेट घेऊन अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्याची चर्चा जाहीरपणे होत आहे.

कोण आहेत ते?

चौकशी झालेले कृषी विभागातील अधिकारी असे – तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदेवे, आर. एस. रानगे, आर. आय. रूपनर, राजमाने, एस. जी. निकम, पी. पी. पाटील, डोईफोडे, एन. एम. पाटील, डी. बी. पाटील, मंडल कृषी अधिकारी डी. वाय. कांबळे, एस. एम. नांगरे, बी. व्ही. पाटील, डी. इ. कांबळे, आर. के. उरणे, सी. डी. सरदेसाई, जी. एस. गोरे, डी. ए. गरगडे, एस. बी. बिरांजे, आर. पी. कामत, एन. एम. पाटील, एम. जी. कोरे, कृषी पर्यवेक्षक डी. व्ही. भांडवले, एस. व्ही. सानप, बी. ए. शिंदे, बी. व्ही. पाटील, एम. ए. आगा, ए. के. पाटील, सी. डी. सरदेसाई, डी. जे. कातकर, आर. व्ही. पाटील, एम. आर. गावडे, एम. एम. लाड, डी. एम. बरकाळे, डी. एम. बरकाळे, एल. एन. चौगुले, कृषी सहायक आर. बी. पाटील, पी. एम. खोपाडे, एस. एस. गावडे, आर. बी. पाटील, आर. ए. होनगेकर, एम. डी. पाटील, एस. बी. पोवार, एस. एस. शेटे, एस. पी. कुंभार, बी. आर. जाधव, एम. ए. गायकवाड, एस. एम. डवरी, डी. जी. कुंभार, एस. आर. नाईक, एम. टी. नलवडे, बी. आर. पाटील, एम. टी. नलवडे, ए. एम. लटके, एल. बी. होसुरे, के. जी. तामकर.

आठ तालुक्यांतील अधिकारी

चौकशी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांकडे योजना अंमलबजावणी कालावधीत भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, करवीर या तालुक्यातील पाणलोट योजनेची कामे झालेल्या गावांचा कार्यभार होता. बदली न झालेल्या अधिकाऱ्यांकडे अजूनही कार्यभार आहे.

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *