facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / वैधानिक समितीलाच ठेंगा

वैधानिक समितीलाच ठेंगा

आवाज न्यूज लाईन

नाशिक:आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा फटका खुद्द आदिवासींच्या कल्याण योजनांचे ऑड‌िट करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र विधीमंडळ अनुसूचित जमाती समितालाच बसला आहे. समितीतर्फे माहिती संदर्भात एक महिना अगोदर सुचना देवूनही अप्पर आयुक्तांनी बुधवारी समितीसमोर परिपूर्ण माहितीच सादर केली नाही. त्यामुळे समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रेसह बारा सदस्य आमंदारानी चक्क समितीचे काम स्थगित करत दौऱ्यावरच बहिष्कार टाकत माघारी फिरले. त्यामुळे तीन दिवसांचा समिती दौरा रद्द झाला असून, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेची गंभीर दखल घेत जबाबदार अधिकाऱ्यांची तत्काळ साक्ष नोंदवून दोषींवर कारवाईची शिफारस करण्यात येणार आहे.

अनुसूचित कल्याण समितीमार्फत आदिवासींच्या विविध योजनांचा व निधींचा आढावा दरवर्षी घेतला जातो. समिती बुधवारपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आली होती. बैठकीसाठी म्हात्रे यांच्यासह सदस्य चंद्रकांत रघुवंशी, डॉ. अशोक उईके, वैभव पिचड, प्रा. चंद्रकात सोनवणे, प्रभुदास भिलावेकर, आंनद ठाकुरासह बाराजणांनी उपस्थित लावली होती. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेसह अप्पर आयुक्तांना योजना, निधीचा विनीयोग, पेसा अंतर्गत नोकरभरतीची माहिती देण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी व जिल्हापरिषेदेने आपली माहिती दिली. परंतु अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी, जलसंधारण या विभागांनी समितीने मागितलेली माहितीच सादर केली नाही. सदस्यांना अर्धवट माहिती दिल्याने अध्यक्षांसह सदस्यच संतप्त झाले. अधिकाऱ्यांच्या या मुजोरीमुळे संतप्त सदस्यांनी बैठकच गुंडाळली. तसेच पुढील कामकाजावर बहिष्कार टाकत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *