facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / साठ अतिक्रमणांवर पाथर्डीत कारवाई
23092340236723252381235223502339

साठ अतिक्रमणांवर पाथर्डीत कारवाई

आवाज न्यूज लाईन

अहमदनगर : येत्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने मोहटा देवी गड परिसरातील जवळपास साठ अतिक्रमणे बुधवारी काढली.

सुमारे पंधरा दिवस चालणाऱ्या मोहटे येथील शारदीय नवरात्रोत्सव काळात मोहटा देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक येतात. या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे या भाविकांना त्रास होत असल्याने प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या आदेशानुसार बुधवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तहसीलदार जयसिंह भैसाडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. वाय. ब्राह्मणे, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार तसेच महसूलचे अनेक कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. ही कारवाई सुरू करताच काही अतिक्रमणधारकांनी विरोध केला; मात्र, मोठा बंदोबस्त असल्याने ही मोहीम बिनभोबाट पार पाडण्यात आली. जी अतिक्रमणे बुधवारी काढण्यात आली त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये या साठी सीमारेषाही आखण्यात आली आहे; मात्र, तरीही कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जयसिंह भैसाडे यांनी दिला आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *