facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / आमचे अणुबॉम्ब नुसते दाखवायला नाहीत: पाक
pak-defence-minister

आमचे अणुबॉम्ब नुसते दाखवायला नाहीत: पाक

उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतानं इस्लामाबादेत होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला आणि ही परिषद गुंडाळावी लागली. हा पाकिस्तानला मोठा झटका मानला जात असतानाच, आता पाकिस्ताननं भारताला थेट इशारा देऊन वादाला आणखी फोडणी देण्याचं काम केलं आहे. आमच्याकडील अणु बॉम्ब केवळ दाखवण्यासाठी नाहीत, असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.

जर पाकिस्तानला आपलं अस्तित्व धोक्यात असल्याचं जाणवलं, तर आम्ही अण्विक शस्त्रांचा वापर करण्यास कचरणार नाही, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं आहे. विशेष म्हणजे, १७ सप्टेंबरला जिओ वाहिनीवरील मुलाखतीतही त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर उरीत हल्ला झाला होता.

काश्मीरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे तुकडे होतील. काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन यशस्वी झाल्यास भारताचा शेवट सुरू होईल, असंही ख्वाजा म्हणाले. काश्मीरमधील जनतेचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले; मात्र भारताकडून कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असा कांगावाही त्यांनी केला.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *