facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / .. म्हणून ८ वर्षांनंतर धोनीची ‘ती’ प्रेयसी पुन्हा चर्चेत

.. म्हणून ८ वर्षांनंतर धोनीची ‘ती’ प्रेयसी पुन्हा चर्चेत

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित  ‘एम एस धोनी-  द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होईल. हा चित्रपट जगभरात ४५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होण्याचा रेकॉर्ड करणार आहे. ‘एम एस धोनी-  द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट आधीपासूनच चर्चेत राहिला आहे. यातील एक कारण म्हणजे चित्रपटातील इतर कलाकार. सदर चित्रपटात भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाच्या खेळाडूंची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहावयास मिळत आहे. धोनीवर बनलेल्या या चित्रपटात त्याच्या आयुष्याशी जोडलेले काही महत्त्वाचे पैलू दाखविण्यात येणार आहेत. यात त्याच्या लग्नापूर्वीची प्रेमकथाही दाखविली जाईल.
धोनीची आधी प्रियांका झा नामक प्रेयसी होती. पण तिचा एका अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री लक्ष्मी राय हिच्यामुळे या चित्रपटाच्या चर्चेत आणखीनच भर पडली आहे. लक्ष्मीने म्हटलेय की,  या चित्रपटात माझ्याबाबत काहीच नसेल अशी मला आशा आहे. तसंही हा बायोपिक धोनीबद्दल असून त्याच्या रिलेशनशीपबाबत नाही. मला वाटतं की अशा प्रश्नांवर धोनीप्रमाणे मीदेखील उत्तरं द्यायला नकोत. कोणत्याही मुलीला तिचे नाव कोणासोबतही सदैव जोडले गेलेले आवडणार नाही. पुढे ती म्हणाली की, मी धोनीच्या बायोपिकमध्ये दिसणार की नाही हा प्रश्न लोक मला का विचारत आहेत तेच कळत नाहीए. मी आणि धोनी आम्ही दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. धोनीचं आता लग्न झालेलं आहे. पण लोक अजूनही त्यातच अडकलेले असून चित्रपटाची चर्चा झाल्यापासून त्यात मलाही गोवत आहेत.
महेंद्रसिंग धोनी २००८ साली चेन्नई संघाचा कर्णधार होता. त्यावेळी त्याचे आणि लक्ष्मी रायचे नाव जोडले गेले होते. पण धोनीने स्वतःहून या नात्याबाबत कधीच काही वक्तव्य केले नव्हते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *