facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / देश / विदेश / अदनान सामीनं गायले मोदी सरकारचे गुणगान!

अदनान सामीनं गायले मोदी सरकारचे गुणगान!

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड जगतातनंही ट्विटवर्षाव होत असून, जन्मानं पाकिस्तानी असलेला आणि नुकताच भारतीय नागरिकत्त्व मिळालेला गायक अदनान सामीनंही भारत सरकारचे गुणगान गायले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय आणि लष्कराच्या शूर जवानांचे खूप खूप अभिनंदन!, असं ट्विट अदनाननं केलं आहे. विशेष म्हणजे अदनानला यावर्षी जानेवारीत भारतीय नागरिकत्त्व देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं ”मला मिळालेला नवीन जन्म आणि ही सर्वात सुंदर भेट आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Check Also

क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

आवाज न्यूज नेटवर्क – क्युबाचे माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *