facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / आता पाणीमीटरवरून आयुक्त लक्ष्य!

आता पाणीमीटरवरून आयुक्त लक्ष्य!

आवाज न्यूज लाईन

नवी मुंबई : पाण्याचा वापर मोजण्यासाठीचे ‘अॅटोमॅटिक मीटर रिडिंग’ बसवण्यासंदर्भात सभागृहाने कोणताही निर्णय घेतला नसताना, प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक सदनिकाधारकाने हे मीटर ३ ऑक्टोबरपर्यंत बसविण्याची सक्ती करणारी नोटीस दुसऱ्यांदा बजावली आहे. त्यावरून नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी बुधवारी पुन्हा एकदा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य केले.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील नळ जोडण्यांवर ई. ई. सी मान्यताप्राप्त ‘एएमआर’ बसविण्यात रहिवाशांना नोटिसा पाठवल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हे ऑटोमेटिक मीटर बाजारात उपलब्ध नसल्याने तसेच, याबाबत सर्वसाधारण सभेने धोरणात्मक निर्णय घेतला नसल्याने प्रशासनाने या मीटरची सक्ती करू नये, अशी सूचना करत हे मीटर बसविण्याचा प्रस्ताव रद्द केला होता. असे असूनही प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशानुसार ३ ऑक्टोबरपर्यंत मीटर बसविण्याची सक्ती करणारी नोटीस दुसऱ्यांदा बजावून सर्वसाधारण सभेच्या निर्णयाचा अवमान केल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनावणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. या नोटिशीमुळे बाजारात मीटर उपलब्ध नसल्याने नळजोडणी खंडीत होईल, अशी भीती सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाल्याचा आरोपही महापौरांनी केला.
सभागृहाने ही ऑटोमेटिक मीटर कोणी बसवावे, याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. १५ मि.मी. वरील नळजोडणी असलेल्या ग्राहकांना महापालिकेने आपल्या खर्चाने एएमआर मीटर बसवून त्याचे भाडे नंतर त्यांच्या बिलातून वसूल करण्यासंदर्भातील धोरण ठरवून तसा प्रस्ताव सभागृहापुढे मान्यतेसाठी ठेवावा, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. मात्र प्रशासनाने तरीही नोटीस पाठवली. प्रशासनाचा हा खोटारडेपणा कधीही खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत एएमआर मीटर बसविण्याबाबत तीन महिन्यांची मुदत देण्याचे सर्वपक्षीय पदाधिकारी व प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत ठरले असताना ही नोटीस पाठवून रहिवाशांची दिशाभूल केल्याचा आरोप महापौरांनी केला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *