facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / आशिया कप: भारताला जेतेपद

आशिया कप: भारताला जेतेपद

चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल डागून बांगलादेशचा पराभव करत भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

भारताला सलामीच्या लढतीत बांगलादेशकडून ४-५ ने पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा काढत अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर ५-४ अशा गोलफरकाने विजय मिळवला.

भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. चौथ्या मिनिटालाच गुरजंत सिंहने गोल डागून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १४व्या मिनिटाला अजितकुमार पांडेने दुसरा गोल डागला तर पाठोपाठ २०व्या मिनिटाला परमिंदर सिंहने तिसरा गोल डागला आणि ३-० अशी आघाडी घेत भारताने सामन्यावर घट्ट पकड बसवली.

दुसऱ्या सत्रात मात्र बांगलादेशने जोरदार कमबॅक केला. काही मिनिटांच्या फरकाने बांगलादेशने दोन गोल डागले. त्यानंतर भारत आणि बांगलादेश दोन्ही बाजूने अधिक आक्रमक खेळ पाहायला मिळाला. यादरम्यान भारताकडून एक तर बांगलादेशकडून आणखी दोन गोल डागण्यात आले आणि ४-४ अशी बरोबरी झाली. शेवटच्या मिनिटापर्यंत सगळ्यांचीच उत्कंठा ताणली गेली होती. मात्र सामन्याचा निर्धारित वेळ संपायला अवघे २० सेकंद उरले असतानाच अभिषेकने चेंडू गोलपोस्टमध्ये डागला आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, या विजयाबद्दल गृहमंत्री राजनाथ सिंह, क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *