facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा वाहतूक ठप्प

जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा वाहतूक ठप्प

आवाज न्यूज लाईन

चिपळूण : कोकणात काल पासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडीला नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

परशुराम घाटात दरड कोसळली
चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे परशुराम घाटात दरड कोसळल्याचीही घटना घडली आहे. यामुळे वाहनांची कोंडी टाळण्यासाठी चिपळूणमधील वाहतूक कराडमार्गे वळवण्यात आली आहे.

ठिकठिकाणी पाणी साचल्याने दापोली आणि खेड मार्गावरील वाहतुकही पूर्णपणे बंद झाली आहे. खेडमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मुंबई-गोवा मार्गावर पुराची पातळी वाढल्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

जगबुडी नदीबरोबरच नारंगी आणि चोरद या नद्यांनाही मोठा पूर आला आहे. चोरद नदीला पूर आल्याने परिसरातील ३२ गावांचा संपर्क तुटला आहे. बिजघर पुलावरून एक युवक वाहून गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

पोलादपुरातही दरड कोसळली

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात असलेल्या ओबळी या गावाजवळ दरड कोसळून तीन घरांचे नुकसान झाले आहे. जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.

राज्यभरातही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून नांदेडमध्ये रेल्वेरुळ वाहून गेल्याचे वृत्त आहे. तर उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *