facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / दिग्गजांचा पत्ता कट?

दिग्गजांचा पत्ता कट?

आवाज न्यूज लाईन

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचनेचे काम पूर्ण झाले असून आरक्षणाची सोडत सोमवारी काढली जाणार आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी १५ प्रभागांत आरक्षण ठेवण्यात आले असल्याचे समजते. २०१२च्या निवडणुकीत ११ प्रभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित होते. यंदा चार प्रभागांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक बड्या नगरसेवकांचे पत्ते कापले जाण्याची दाट शक्यता आहे.
पालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे. शहरातील लोकसंख्या कमी झाल्याने आणि उपनगरात वाढल्याने प्रभाग रचना बदलण्यात आल्या आहेत. ५० ते ५५ हजार मतदारांसाठी एक नगरसेवक असणार आहे. लोकसंख्येमुळे प्रभाग रचना बदलल्याने शहरातील सात प्रभाग कमी होऊन उपनगरात वाढणार आहेत. पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या वाढल्याने २२७ पैकी १५ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत. २००७ व २०१२ च्या निवडणुकांमध्ये ११ प्रभाग राखीव होते. २०१७मध्ये त्यात चार प्रभागांची वाढ होणार आहे.

पालिकेने २००७ व २०१२ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी २२ प्रभागांची यादी बनवली होती. त्यापैकी ११ प्रभाग मागील दोन्ही निवडणुकांमध्ये बदलते ठेवण्यात आले होते. २०१७च्या निवडणुकीसाठी पालिकेने अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असलेल्या तब्बल ६० प्रभागांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यापैकी १५ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. या १५ प्रभागापैकी ५० टक्के आरक्षणानुसार महिलांसाठी कोणते आठ प्रभाग राखीव असतील हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.

आरक्षित नवीन प्रभाग

ए : २२४, २२५ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक २२५

ई : २०२,२०६,२०७,२०८ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक २१०

एफ दक्षिण : १९५,१९६ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक २००

एफ उत्तर : १६५,१६६ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १७३

जी दक्षिण : १८६,१९०, १९१ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १९५,

१९१, १९४ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १९८

जी उत्तर : १७८,१७९ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १८८

एच पूर्व : ८८, ८९ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक ९३

एल : १६०, १६२, १६३ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १६९

एम पूर्व : १३४,१३९ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १४२,

१२९,१३८ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १३९

एम पश्चिम : १४३,१४४,१४६ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १५२,

१४२,१४३,१४४ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १५४,

१४२,१४३ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक १५५,

आर दक्षिण : २५,२६ प्रभागामधून नवा प्रभाग क्रमांक २६

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *