facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / नदीसुधार योजनेसाठी २१ कोटींचे अनुदान

नदीसुधार योजनेसाठी २१ कोटींचे अनुदान

आवाज न्यूज लाईन

पुणे : केंद सरकारच्या नदीसुधार योजनेच्या अंतर्गत शहरात केल्या जाणाऱ्या कामांसाठी आणखी २१ कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळाले आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, यासाठी महापालिकेने तेरा टेंडर तयार केली आहेत. त्यासाठी केंद्र सरकार म‌हिनाभरात सल्लागार नेमणार आहे. सल्लागाराच्या मान्यतेनंतर मुळा-मुठा नदी सुधारणा प्रकल्पाची कामे सुरू होतील, असा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकारच्या नदीसुधार योजनेच्या माध्यमातून शहरातील मुळा आणि मुठा नदी काठावर अकरा ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. या ठिकाणी सुमारे चारशे एमएलडी पाण्यावर दररोज प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार आहे. यासाठी बाणेर परिसरात ४३ किलोमीटरची ड्रेनेज लाइनची तसेच या केंद्रांना जोडणाऱ्या शंभर किलोमीटरच्या ट्रंकलाइनची कामे केली जाणार आहेत. तसेच प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीआयएस सिस्टिम विकसित केली जाणार असून, काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी जायका या कंपनीने केंद्र शासनाला सुमारे ८१० कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. केंद्र सरकार अनुदानाच्या माध्यमातून पुणे महापालिकेला हा निधी देणार आहे. त्यापैकी ५ कोटी रुपये यापूर्वीच महापालिकेला मिळाले असून, आणखी २१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
नदीसुधार योजनेला केंद्र शासनाकडून अनुदान मिळणार असल्याने यावर केंद्र शासनाचे नियंत्रण राहाणार आहे. केंद्र शासन यासाठी सल्लागार नेमत असून येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पुर्ण होईल. महापालिकेच्या माध्यमातून नदी सुधार योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या १३ कामांची स्वतंत्र टेंडर्स तयार केली आहेत. केंद्रीय सल्लागाराच्या मान्यतेनंतर ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात येईल. पुढील महिन्या दीड महिन्यात नदी सुधार योजनेच्या कामाला सुरुवात होईल, असे पालिका आयुक्त कुमार यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *