facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / नवरात्रीमध्ये महिला बाऊन्सर्सचे वाढते प्रमाण

नवरात्रीमध्ये महिला बाऊन्सर्सचे वाढते प्रमाण

आवाज न्यूज लाईन

मुंबई : वरात्रीमध्ये दांडिया खेळणाऱ्या गर्दीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे या गर्दीला सांभाळण्यासाठी महिला बाऊन्सर्स अधिक उपयोगी पडतात. परिणामी गेल्या काही वर्षांमध्ये महिला बाऊन्सर्स आणि सुरक्षारक्षकांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. नवरात्रीसारख्या उत्सवामध्ये शारीरिक बळाचा वापर करण्यापेक्षा योग्य शब्दांमध्ये समजूत काढून गर्दीवर नियंत्रण मिळविणे महिला बाऊन्सर्सच्या माध्यमातून शक्य होत आहे. त्यामुळे मंदिरांमध्येही महिला नवरात्रीदरम्यान महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जात आहे.

भुलेश्वरच्या मुंबादेवी मंदिरामध्ये नवरात्रीदरम्यान दररोज ४० ते ५० हजार भाविकांची गर्दी होते. त्यातही शनिवार-रविवारी ही गर्दी एक लाखांपर्यंत जाते. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये महिला सुरक्षारक्षकांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याची माहिती मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली. मुंबादेवीच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये इतर स्वयंसेवकासोबत ५० पुरुष आणि महिला बाऊन्सर्स असतील, असे जाधव यांनी सांगितले.
दांडिया क्वीन फालुग्नी पाठक हिच्या पुष्पांजली नवरात्री उत्सवाच्या कार्यक्रमासाठी ४० ते ५० टक्के महिला बाऊन्सर्सची नियुक्ती करण्यात येते. गेल्या वर्षापासून महिला बाऊन्सर्स या कार्यक्रमासाठी अधिक प्रमाणात तैनात करायला सुरुवात झाल्याचे श्रीया इव्हेन्ट्सच्या शेखर रामचंद्रन यांनी सांगितले. या वर्षी सुमारे ४० महिला बाऊन्सर्स या कार्यक्रमामध्ये सुरक्षेची काळजी घेतील. सर्वसाधारणपणे नवरात्रीच्या कार्यक्रमात नाचण्यासाठी व्यापलेल्या जागेवरून वाद होतात. त्यामुळे हे वाद सोडवण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांचा अधिक उपयोग होतो. लोकही महिलांनी सांगितलेल्या गोष्टी चटकन ऐकतात असे आढळून येते, अशीही माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये १५ ते ३० हजार दांडियाप्रेमी सहभागी होतात.

महिला बाऊन्सर प्रतीक्षा सुर्वे (नाव बदलून) सांगतात की ज्या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी असतात तिथे महिलांमध्ये सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्त चुरस असते. अशा वेळी ही गर्दी नियंत्रित करणे खूप कठीण असते. लोकांना फोटो काढण्यापासून थांबवणे ही यातील सर्वांत मोठी समस्या असते. इतर वेळी नवरात्रीच्या कार्यक्रमात खूप त्रास होत नाही, असे त्या सांगतात. शारीरिक ताकदीपेक्षा कधी दटावून, कधी समजावून अनेक समस्या सुटतात. यासाठी महिला बाऊन्सर्सना संवाद कसा साधावा याचे प्रशिक्षण दिले जाते. पब, डिस्कोप्रमाणे नवरात्रीमध्ये दारू पिऊन येणाऱ्या महिलांची समस्या फारशी नसते. त्याशिवाय मोठ्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमस्थळी येण्याआधी नीट तपासणी होते. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यक्रमस्थळी उगाच तमाशा होण्याची शक्यता कमी असते, असेही सुर्वे यांनी सांगितले.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *