facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / मुंबई / पोलिसांना सात तास ड्युटी

पोलिसांना सात तास ड्युटी

मुंबई : कधी १२ तर कधी २४ तास… ड्युटीच्या या अनियमित तासांमुळे त्रासलेल्या पोलिसांच्या व्यथा लक्षात घेऊन, जे.जे. मार्ग पोलिसांनी ७ तास ड्युटीचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. चार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पोलिस ठाण्याचे काम रोटेशननुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व पोलिसांना दुपार आणि रात्रीचे जेवण घरी करता येणे शक्य होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले.

 कामाचा अतिरिक्त ताण, कमी संख्याबळ, बंदोबस्त, मोर्चे, आंदोलन या कामात व्यग्र असलेल्या पोलिसांना त्यांच्या आरोग्याकडे पाहण्यास वेळ मिळत नाही. २४ तास ड्युटी केल्यामुळे अपुरी झोप आणि बाहेरच्या खाण्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊन विविध व्याधी जडतात. त्यातच पोलिसांवर होणा‍ऱ्या हल्ल्यांमुळे दिवसेंदिवस पोलिस शिपाई मनातून खचत आहेत. कुटुंबालाही वेळ देता येत नसल्याने पोलिस कर्माचारी मानसिक तणावाखाली जात आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून पोलिस कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांच्या परवानगीने जे.जे. पोलिस ठाण्यात फक्त ७ तास ड्युटी हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.

पोलिस ठाण्यातील १४० कर्मचा‍ऱ्यांचे चार गटात विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटात ४० पोलिस शिपाई असणार आहेत. या सर्वांना तीन शिफ्टमध्ये फक्त ७ तास काम करावे लागणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ८ ते दुपारी ३, दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते रात्री १० आणि तिसरी शिफ्ट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. तर पोलिस ठाण्यातील कार्यालयीन काम पाहणारे १२ कर्मचारी सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत काम करणार आहेत. कार्यालयीन शिफ्ट वगळता इतर तिन्ही शिप्ट या रोटेशननुसार बदलत राहणार आहेत. या प्रत्येक तुकडीत १० पोलिस अधिकारी राहणार आहेत. या सर्व कर्मचा‍ऱ्यांना शनिवार–रविवार सोडून इतर दिवशी सुट्टी देण्यात येणार आहे.

सात तास ड्युटीच्या या उपक्रमामुळे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा कर्मचा‍ऱ्यांना घरी कुटुंबियांसोबत जेवता येणार आहे. त्यामुळे पोलिस कर्मचा‍ऱ्यांना मानसिक आणि कौटुंबिक समाधान मिळेल. आनंददायी वातावरणामुळे पोलिस सक्षमरित्या त्यांच्या जबाबदा‍ऱ्या नित्यनियमाने पार पाडतील.

– दिलीप शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जे.जे. मार्ग पोलिस ठाणे

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *