facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / प्रशासनाने माफी मागावी अन्यथा…

प्रशासनाने माफी मागावी अन्यथा…

आवाज न्यूज लाईन

पुणे : धनकवडी येथील टीडीआर प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेल्या नगरसेवक सुभाष जगताप यांनी या प्रकरणात आपला काहीही दोष नसून पालिका प्रशासनाने चुकीची माहिती माध्यमांना दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाने आपली लेखी माफी मागून टीडीआर रद्द करण्याचे पत्र मागे घ्यावे अन्यथा आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही दिला आहे.
धनकवडी येथील एका जमिनीचा टीडीआर सुभाष जगताप यांना महापालिकेने २०१० मध्ये दिला होता. या जागेच्या मालकीच्या उताऱ्यामध्ये इतर हक्कांमध्ये आपले नाव असताना व आपण हरकत घेतलेली असतानाही पालिका प्रशासनाने हा टीडीआर जगताप यांना कसा दिला, अशी हरकत घेतली होती. महापालिका आपल्या हरकतीला दाद देत नाही, हे पाहिल्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालय निकाल देण्याची वेळ येताच पालिका प्रशासनाने त्यापूर्वीच जगताप यांना देण्यात आलेला टीडीआर रद्द करण्यात आल्याचे पत्र थोरवे यांना दिले होते.

या पत्रात जगताप यांच्या विनंतीवरूनच हा टीडीआर रद्द करण्यात आल्याचेही म्हटले होते. या सगळ्यालाच जगताप यांनी हरकत घेतली आहे. या जागेवर पालिकेने परस्पर रस्त्याचे काम सुरू केले होते. त्या वेळेस आपण हरकत घेतल्यानंतर पालिकेने जागेची नुकसान भरपाई म्हणून आपल्याला टीडीआर दिला आहे. तो देतानाही पालिकेने एक तृतीयांशच इतकाच दिला आहे. त्यामुळे आपले या पूर्वीच नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तो रद्द करणे हा आपल्यावर अन्याय आहे.
या जमिनीच्या मालकी हक्कांवरून २००८मध्ये वाद झाला होता. त्या वेळेस या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर आपले नाव लावण्यात येऊ नये, अशी हरकत थोरवे यांनी घेतली होती. पण सर्कल अधिकाऱ्यांनी ती फेटाळली होती. त्यानंतर थोरवे यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितलेली नाही; तसेच थोरवे यांचे इतर हक्कांमध्ये नोंदविण्यात आलेल्या नावाबद्दलही आक्षेप घेण्यात आले आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *