facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Uncategorized / ‘फक्त नांगी मोडू नका, पाकला पूर्णपणे ठेचा!’

‘फक्त नांगी मोडू नका, पाकला पूर्णपणे ठेचा!’

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान ज्या मस्तवालपणे वागत होता व आपले कोण काय वाकडे करणार अशा थाटात शेपटांचे फटकारे आपटीत होता, ते शेपूटच आपल्या धडक लष्करी कारवाईने उखडून टाकले आहे. आज शेपूट मारले, आता डोके ठेचण्याची वेळ आली आहे. सापाला अर्धवट मारू नये व विंचवाची फक्त नांगी मोडू नये. त्यांना संपूर्ण खतम केले नाही तर ते डंख मारीतच राहतील. पाकिस्तानला पूर्णपणे ठेचूनच आता थांबायला हवे, अशा भावना शिवसेनेनं व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर जाऊन धक्का देण्याचे काम ज्या भारताच्या लष्कराने केले त्याला मानवंदना देण्याचे काम देशाने आता करायचे आहे. या धडक कारवाईसाठी लष्कराला पूर्ण मोकळीक दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आम्ही अभिनंदन करतो, अशी कौतुकाची थापही ‘सामना’च्या अग्रलेखात देण्यात आली आहे. लष्कराला स्वातंत्र्य दिले तर ते पाकड्यांना त्यांच्याच भूमीत खडे चारतील व लाहोर, कराची, इस्लामाबादवर तिरंगा फडकवतील, असंही सेनेनं नमूद केलंय.

> पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणार्‍या शूर जवानांना मानाचा मुजरा करीत आहोत. भारताच्या फौजा नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानात घुसल्या व पाकड्यांनी चालवलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यालाच म्हणतात मूंहतोड कारवाई.

>> बर्‍याच काळानंतर पाकिस्तानच्या छाताडावर बंदूक रोखून ही चढाई केली आहे. भारतीय लष्कराला चढाईचा आदेश हवा होता तो मिळाला व निधड्या छातीचे जवान पाकिस्तानात घुसले.

>> सरकारने इतक्यावरच थांबता कामा नये. पाकिस्तानला पूर्णपणे ठेचूनच आता थांबायला हवे. सापाला अर्धवट मारू नये व विंचवाची फक्त नांगी मोडू नये. त्यांना संपूर्ण खतम केले नाही तर ते डंख मारीतच राहतील.

>> पाकिस्तान म्हणजे जगाच्या नकाशावरील एक सडका मेंदू व नासका आंबा आहे. जागतिक दहशतवादाचा तो अखंड चालणारा कारखाना आहे. हिंदुस्थानच्या द्वेषावर निर्माण झालेले हे राष्ट्र पुढे त्याच द्वेषाला प्राणवायू समजून जगू लागले.

>> काश्मिरातील हिंसाचार हे पाकचेच उद्योग आहेत. पाकवरील ताज्या हल्ल्याने कश्मीरातील पाक समर्थकांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. आता माघार नाही, पुन्हा पाकड्यांशी चहापान नाही. यापुढे त्यांच्याशी क्रिकेट नाही आणि संगीताचे जलसे नाहीत.

>> भारताचा हल्ला पाकिस्तान आज नाकारत आहे. पण या हल्ल्यानंतर पाकिस्तान स्वस्थ बसण्याची शक्यता नाही याचे भान राज्यकर्त्यांबरोबर देशाच्या जनतेनेही राखायला हवे.

Check Also

राष्ट्रवादीला जबर फटका

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झाले असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *