facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / देश / विदेश / ऑक्टोबरमध्ये बँकांना अकरा दिवस सुट्ट्या!

ऑक्टोबरमध्ये बँकांना अकरा दिवस सुट्ट्या!

येत्या ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका अकरा दिवस बंद राहणार आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात बँकांना सुटट्या असल्यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी नियोजनपूर्वक आर्थिक व्यवहार करावेत, असा सल्ला जाणकार देत आहेत.
ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), ८ ऑक्टोबरला दुसरा शनिवार, त्यानंतर ९ ऑक्टोबरला रविवार असून, १० आणि ११ तारखेला दसऱ्याची सुट्टी आहे. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी मोहरमची सुट्टी आहे. त्यानंतर ३० (लक्ष्मीपूजन) आणि ३१ ऑक्टोबर (बलिप्रतिपदा) रोजी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

ऑक्टोबरमधील पाच रविवार (२,९,१६,२३ आणि ३०) तसेच दुसरा आणि चौथा शनिवार (८ आणि २२ ऑक्टोबर) या दिवशीही बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर घर किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यापूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते. बँका बंद असल्यामुळे सर्वांत मोठी समस्या चेक क्लिअरन्सची निर्माण होऊ शकते.

Check Also

क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

आवाज न्यूज नेटवर्क – क्युबाचे माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *