facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / राजापूरची गंगा पुन्हा अवतरली

राजापूरची गंगा पुन्हा अवतरली

आवाज न्यूज लाईन

रत्नागिरी : राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगेचा जोरदार प्रवाह सुरू झाला आहे. नैसर्गिक चमत्कार मानला गेल्याने राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेली राजापूरची गंगा साधारणपणे दर तीन वर्षांनी येते; मात्र या वेळी ती नऊ महिन्यांत परत आली आहे. गेल्या वर्षी २७ जुलैला आलेली गंगा १०२ दिवसांनी पाच नोव्हेंबर रोजी निर्गमित झाली होती.

गंगा दुष्काळात आणि उन्हाळ्यात येते, असे मानले जाते. मात्र, गेली चार वर्षे गंगा पावसाळ्यातच प्रकट होत आहे. अनियमितपणा आल्याने गंगा आल्याच्या अफवा अनेकदा पसरल्या. आता गंगा आली आहे. अनेकांनी तिथे पहिल्या स्नानाची पर्वणी साधली. अजून गंगातीर्थावर गर्दी झालेली नाही. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणारे मुंबईकर चाकरमानी गंगास्नानासाठी गर्दी करतील, अशी शक्यता आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *